थकबाकीदारांची वीज कापली

By Admin | Updated: February 9, 2017 03:32 IST2017-02-09T03:32:22+5:302017-02-09T03:32:22+5:30

थकबाकीदार उच्च व लघु दाब वीजग्राहकांविरोधात महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र केली आहे.

The power of the defaulters was cut off | थकबाकीदारांची वीज कापली

थकबाकीदारांची वीज कापली

पुणे : थकबाकीदार उच्च व लघु दाब वीजग्राहकांविरोधात महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र केली आहे. गेल्या ५ दिवसांत पुणे परिमंडलातील ५ हजार ५१७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कापण्यात आला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणच्या विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत. याशिवाय, तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे परिमंडलातील ५ हजार ५१७ थकबाकीदारांचा ३ कोटी ५५ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
थकीत वीजबिलांच्या वसुली
कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केली आहे.
ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The power of the defaulters was cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.