उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वीजजोड तोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:51+5:302021-03-04T04:17:51+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी ...

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वीजजोड तोडणी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी भागातील सुमारे १५ डीपी महावितरणने
घोषणा झाल्यानंतरही बंद केल्या आहेत
सध्या घरगुती आणि कृषी पंपाच्या वीज बिलांच्या वसुलीचा प्रश्न गंभीर आहे. सक्ती करणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली असल्याचे जाहीर केले. तरी कंपनीचे अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे वसुलीसाठी दबाव आणत आहेत. त्यातूनच डीपी बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत.
कळस व परिसरात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कळस व गोसावीवाडी परिसरातील गावातील थकीत कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या दारावर धडकल्या त्याप्रमाणे वीजबिल माफीची घोषणा देखील अपेक्षित होती. पण तसे झाले नाही. वीजबिल भरणा करावा लागणार नाही अशीच अपेक्षा अनेकांची होती. अनेकांनी बिल भरले नाही
वीज पंपाच्या अश्वशक्तीप्रमाणे प्रमाणे बिलाची वसुली करावी, शेतकर्यांसाठी असणारी कृषी संजीवनी योजना समजावून सांगून त्याप्रमाणे वसुलीची अंमलबजावणी करावी. थकीत वीज बिलासाठी योग्य प्रमाणात हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
चौकट
गोसावीवाडी भागातील सुमारे १५ डीपी विधीमंडळात स्थगितीची घोषणा झाल्यानंतरही सोडवण्यात आल्या आहेत आमचे पिण्याचे पाणी व शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. घरामध्येही लाईट नसल्याने अंधारात राहावे लागणार आहे.
विजय खर्चे ,ग्रामपंचायत सदस्य
.
महावितरण विभागाकडून कोणताही डीपी बंद करण्यात आला असल्यास कर्मचारी विभागाला तो पुन्हा जोडून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- मोहन सुळ,वालचंदनगर उपविभाग,कार्यकारी अभियंता