वालचंदनगरमध्ये सत्तापरिवर्तन
By Admin | Updated: August 7, 2015 00:47 IST2015-08-07T00:47:18+5:302015-08-07T00:47:18+5:30
वालचंदनगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत प्रगती पॅनलला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. स्थापनेपासून राष्ट्रवादी पुरस्कृत

वालचंदनगरमध्ये सत्तापरिवर्तन
वालचंदनगर : वालचंदनगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत प्रगती पॅनलला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले. स्थापनेपासून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची सत्ता होती. काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलने ८ जागा जिंकल्या आहेत. आता ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी बसपाचा १ आणि ३ अपक्षांवर मदार आहे. सर्वाधिक जागा काँग्रेस पुरस्कृत पॅनलने जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलपुरस्कृत अंबादास शेळके, रंजना कांबळे, मनीषा खंडागळे, अलका इंगळे, सुहास हिप्पारकर हे पाच जण उमेदवार निवडून आले. तर काँगेसप्रणीत परिवर्तन पॅनलचे नितीन मोरे, संतोष गायकवाड, उज्ज्वल्ला अशोक कांबळे, पद्मिनी परीट, योगेश साबळे, महादेवी कोळी, संदीप पांढरे, छाया मोरे असे ८ उमेदवार निवडून आले आहेत. अपक्ष विजयी झालेल्या उमेदवारांवर राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा केला आहे. या वेळी अनिल वाघेला, सुरेखा सोनटक्के, वैशाली मिसाळ, बहुजन समाज पार्टीचे हर्षवर्धन गायकवाड असे ४ जण विजयी झाले आहेत. त्यांच्याच हाती सत्तेची दोरी राहणार आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या वालचंदनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलला विजय मिळाला होता. यामध्ये वालचंदनगर कंपनीतील कामगारांचे मतदान महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील कामगारवर्ग काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलकडे झुकल्याचे दिसून आले. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. येथील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. आमदार दत्तात्रय भरणे यांनीदेखील वालचंदनगरवर सत्ता राहावी, यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र, मतदारांनी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलला झुकते माप दिले.
निंबोडी : प्रवीण घोळवे, रविंद्र भोईटे, ताराबाई घोळवे, संतोष घोळवे, इंदूबाई घोळवे, संगीता निकम, रमेश घोळवे, कमल वाघमारे, केशर घोळवे
निरगुडे : वसंतराव काजळे, नंदा खंडाळे, सिताबाई लकडे, ब्रह्मदेव केकाण, ज्ञानेश्वर काजळे, अलका केंजळे, रमेश रणधीर, चैत्राली सोनवणे, कविता केकाण
निरवांगी : निलम गुरव, गोपाळ रासकर, विजया कांबळे, महेश रासकर, दशरथ पोळ, मनिषा सूर्यवंशी, शंकर शिंदे, केशरबाई जाधव, रेखा माने
पिटकेश्वर : संजय कांबळे, विजय येरळकर, उषा येरळकर, रामदास राऊत, सुशिला भिसे, शोभा भोंग, अतुल म्हस्के, सविता अभंग, कमल झगडे
रेडा : उत्तम पवार, ब्रह्मदेव देवकर, द्रोपदा देवकर, सचिन देवकर, नंदा माने, शर्मिला देवकर, रामचंद्र मोहिते रुक्मिणी अडसूळ, विमल गायकवाड
रूई : बबन मारकड, बापूराव लावंड, जिजाबाई मारकाड, रुपाली कांबळे, कविता साळुंके, अमोल मराडे, छबा कांबळे, वर्षा पाटील, अजिनाथ मारकड, काका पांढरमिसे, उषा थोरात
सणसर : नानासाहेब निंबाळकर, संगिता निंबाळकर, गजेंद्र मोरे, सिमा चव्हाण, माधुरी नरुटे, अक्षय काटकर, अभयसिंह निंबाळकर, शोभा निंबाळकर, यजूवेंद्र निंबाळकर, अरुणा खवळे, शरद कांबळे, संध्या नाळे, कामिनी चव्हाण, श्रीनिवास कदम, ललिता गायकवाड, सारिका पवार