टपाल विभागाची भरतीला स्थगिती
By Admin | Updated: November 18, 2016 05:14 IST2016-11-18T05:14:53+5:302016-11-18T05:14:53+5:30
टपाल विभागातील भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती झाल्यानंतर निवडप्रक्रियेला स्थगिती दिल्याने राज्यभरातील अंध उमेदवारांनी पुणे स्टेशनजवळील

टपाल विभागाची भरतीला स्थगिती
पुणे : टपाल विभागातील भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती झाल्यानंतर निवडप्रक्रियेला स्थगिती दिल्याने राज्यभरातील अंध उमेदवारांनी पुणे स्टेशनजवळील टपाल विभागाच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. नियुक्तिपत्र दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या वतीने मार्च २०१५मध्ये मल्टिटास्कींग स्टाफ व पोस्टमन या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यातील २ हजार ४३३ यशस्वी उमेदवारांपैकी
पाचशे उमेदवारांची निवड मे २०१६ मध्ये झाली. (प्रतिनिधी)