शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकरनरचे दर कमी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:47 IST

सर्वसामान्यांना घर घेणे अवघड झाले असून जमिनींच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, यास कारणीभूूत असलेल्या रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरांमध्ये घट करण्याची महत्त्वपूर्ण तरतूद राज्य शासनाने केली आहे.

पुणे : सर्वसामान्यांना घर घेणे अवघड झाले असून जमिनींच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, यास कारणीभूूत असलेल्या रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरांमध्ये घट करण्याची महत्त्वपूर्ण तरतूद राज्य शासनाने केली आहे. तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे रेडीरेकनरपेक्षाही कमी दरात व्यवहार होत असलेल्या भागांमध्ये रेडीरेकनरचा दर कमी होऊ शकणार आहे. परिणामी पुढील काळात घरे आणि जमिनीच्या किमती कमी होण्यास मदत होईल.घर आणि जमिनी खरेदी- विक्री व्यवहारात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रेडीरेकनर निश्चितीच्या पद्धतीवर अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. मात्र, शासनाला रेडीरेकनरच्या माध्यमातून मोठा महसूल मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. रेडीरेकनरपेक्षा कमी दराने व्यवहार होत असताना काही ठिकाणी त्यात सातत्याने केवळ वाढच केली जात होती. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यानुसार रेडीरेकनरचे दर वाढविले जातात. मात्र, या कायद्यामध्ये दर कमी करण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे काही भागात रेडीरेकनरच्या दरांपेक्षाही कमी दरात व्यवहार होत असताना नागरिकांना वाढीव रेडीरेकनरनुसारच शुल्क भरावे लागत होते. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातील तरतुदीनुसार रेडीरकनरच्या दरात केवळ वाढ होत होती. मात्र, कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने रेडीरेकनरचे दर वाढण्यासोबत कमी सुद्धा होणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेHomeघर