शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:09 IST

पुढील आठवड्यात कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराज्यात मान्सून सक्रीय असला तरी अनेक भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा

पुणे : पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर नव्हता. मुंबईत काही ठिकाणी तर कोकणात सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती.राज्यात मान्सून सक्रीय असला तरी अनेक भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये ७ मिमी तर सांगली व साताऱ्यात अनुक्रमे १ व २ मिमी पावसाची नोंद झाली. तर कोकण विभागात मुंबईत काही ठिकाणी तर अलीबाग, रत्नागरी या शहरांमध्ये पावसाचा जोर राहिला. विदर्भ व मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये तुरळक पाऊस पडला. पुढील आठवड्यात सोमवारी कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी तर दि. ३ व ४ जुलै रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील चार दिवस मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोकण व विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात खेड व कर्जतमध्ये ७० मिमी, बेलापुर, खालापुर, पेण, वैभववाडी ६० मिमी, चिपळुण, कल्याण, कणकलवी, मंडणगड, माथेरान,राजापूर, ठाणे, उल्हासनगरमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर व सोलापुरमध्ये जोरदार पाऊस झाला. चोवीस तासात दोन्ही ठिकाणी ५० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच गगनबावडा, माढा, जामखेड, एरंडोल, मुळशी, राधानगरी या भागातही पावसाने हजेरी लावली. अन्यत्र पावसाचा जोर कमी होता. विदर्भात बार्शी, वरूडमध्ये ४० मिमी, तर अकोल्यामध्ये ३० मिमी पाऊस पडला. इतर भागात पावसाने हजेरी लावली असली तरी जोर कमी होता. ---------------

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवा