शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आजही मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 01:06 IST

रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सोमवारी झाली आहे़

पुणे : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सोमवारी झाली आहे़ मंगळवारीही शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली़ तो सकाळपर्यंत बरसतच होता़ सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २६़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सकाळीही काही वेळ पावसाचा जोर कमी झाला होता़दुपारी पुन्हा मुसळधार सरी येण्यास सुरुवात झाली़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर पावसाने थोडीशी उसंत घेतली होती़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत ४०़४ मिमी पाऊस झाला़आठवड्यातील पहिलाच दिवस असल्याने कामाला जाणाऱ्या नोकरदारांचे या पावसाने काहीसे हाल झाले़ त्यात सकाळच्यावेळीच शहरातील अनेक ठिकाणी पीएमपीच्या बस बंद पडल्याने वाहतूककोंडीत भर पडली़ पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोटारी रस्त्यावर आल्याने तसेच वाहतुकीचा वेग मंदावल्याने अनेक रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती़पावसामुळे काही प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती़ वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यावंर अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता़>दिवसभरात पडलेला ३८ मिमी पाऊस हा जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे़ १ जूनपासून शहरात आतापर्यंत २५०़९ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा १८़७ मिमीने जास्त आहे़ सोमवारी सकाळपर्यंत लोहगाव येथे १५़७ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत २२२़३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सरासरीपेक्षा तो ४२.२ मिमीने जास्त आहे़ पाषाण येथे सकाळपर्यंत २८़८ मिमी पाऊस पडला आहे़ तेथे आतापर्यंत ३१३़३ मिमी पाऊस झाला आहे़ यंदा २१ जून रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५४़८ मिमी पाऊस झाला होता़ दिवसभरात झालेला हा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस आहे़

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस