शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...त्या पोलिसांची ओली पार्टी व्हायरल, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:52 IST

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे शुक्रवारी सायंकाळी चाकण पोलिसांची जीप दाखल झाली. तेथून मोटारीतून जात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला जीपमधील पोलीस मद्य प्राशन करीत असल्याचे दिसून आले. आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मद्याच्या नशेत असल्याचे निदर्शनास आल्याने कार्यकर्त्याने त्यांना थांबविले.

पिंपरी  - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे शुक्रवारी सायंकाळी चाकण पोलिसांची जीप दाखल झाली. तेथून मोटारीतून जात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला जीपमधील पोलीस मद्य प्राशन करीत असल्याचे दिसून आले. आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मद्याच्या नशेत असल्याचे निदर्शनास आल्याने कार्यकर्त्याने त्यांना थांबविले. आॅन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवू नका, असे पोलिसांना सांगत असल्याचे मोबाइलवरील चित्रीकरण फेसबुकवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. क्षणांत पोलिसांच्या ओल्या पार्टीची चित्रफित सर्वदूर पसरल्याने या प्रकरणाची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.पिंपरीतील काळेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश मालखरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह देहूरोड येथून जात होते. त्या वेळी आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मोटारीत बसूनच मद्य प्राशन करीत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांची जीप थांबवून पोलिसांनी आॅन ड्युटी असे काम करणे चुकीचे आहे. मोटारीत मद्याच्या बाटल्या, फरसाण, शेंगदाणे असल्याचे निदर्शनास आल्याने सहकाºयाला मोबाइलवर चित्रीकरण करण्यास सांगून मालखरे पोलिसांशी संवाद साधत होते.मालखरे यांनी थांबवून ठेवलेल्या मोटारीत पोलीस कर्मचारी वाहनचालक बी. के. साबळे (चाकण पोलीस ठाणे), तसेच हवालदार सोनवणे होते. मालखरे त्यांच्याजवळ येऊन तुम्ही आॅन ड्युटी पोलीस कर्मचारी आहात, तरीही मद्यपान करून वाहन चालवीत आहात. अशा अवस्थेत तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असे म्हणू लागला. त्या वेळी भांबावलेले पोलीस कर्मचारी अक्षरश: हात जोडून त्यास विनवणी करीत होते.कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल‘‘उद्या आम्हाला फाशी घ्यायला लागेल, जाऊ दे आता ’’ असे म्हणत ते मालखरे या कार्यकर्त्याला हात जोडत होते. मात्र, दुस-या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारण देत साबळे यांनी मालखरेसह अन्य दोघांविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोलिसांवरही कारवाई होणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून या प्रकरणी गंभीर दखल घेतली गेली आहे. पोलीस खात्याची बदनामी होईल, असे कृत्य करणाºया पोलीस कर्मचाºयांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे