दोन महिन्यांत पॉझिटिव्हिटी रेट २१ वरून ४ टक्क्यांवर -दिलासादायक - रुग्णसंख्या झपाट्याने झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:31+5:302021-06-09T04:12:31+5:30

मार्च आणि एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढलेली लाट मे आणि जूनमध्ये झपाट्याने ओसरू लागत असल्याचे चित्र दिसत आहे. ७ एप्रिल ...

Positivity rate rises from 21% to 4% in two months - comforting | दोन महिन्यांत पॉझिटिव्हिटी रेट २१ वरून ४ टक्क्यांवर -दिलासादायक - रुग्णसंख्या झपाट्याने झाली कमी

दोन महिन्यांत पॉझिटिव्हिटी रेट २१ वरून ४ टक्क्यांवर -दिलासादायक - रुग्णसंख्या झपाट्याने झाली कमी

मार्च आणि एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढलेली लाट मे आणि जूनमध्ये झपाट्याने ओसरू लागत असल्याचे चित्र दिसत आहे. ७ एप्रिल रोजी पॉझिटिव्हिटी रेट २१.६३ इतका होता, ७ जून रोजी तो ३.७० टक्के इतका खाली आला आहे.

संपूर्ण एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने नवे उच्चांक प्रस्थापित केले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून पुणे हे देशातील 'हॉटस्पॉट' ठरले होते. दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले शहर म्हणून पुण्याची नोंद झाली. गेल्या महिन्याभरातील आकडेवारी मात्र पुणेकरांसाठी दिलासादायक ठरत आहे. दररोजचे रुग्ण चार आकडी संख्येवरून तीन आकडी संख्येवर आल्याने आरोग्य यंत्रणेने काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या ७०१० (८ एप्रिल), सर्वात कमी सक्रिय रुग्ण - १३८३ (७ फेब्रुवारी), तर सर्वाधिक सक्रिय रुग्ण ५६६३६ (१८ एप्रिल) अशी आतापर्यंतची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढू लागली त्याप्रमाणे दररोजच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली. संसर्ग झपाट्याने होत असल्याने नागरिक चाचण्यांसाठी आपणहून पुढे येऊ लागले. ७ मार्च रोजी ६७४३, 7 एप्रिल रोजी 26120, 7 मे रोजी 16763, तर 7 जून रोजी 4775 इतक्या चाचण्या नोंदवण्यात आल्या आहेत. या चार महिन्यांच्या काळात पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्युदर यातही मोठे चढ-उतार पाहायला मिळाले.

दुसरी लाट ओसरत असल्याचा दिलासा असला, तरी कोरोना विषाणूने आतापर्यंतचे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोना गेला, असे वाटले होते. प्रत्यक्षात विषाणू सुप्तावस्थेत गेला होता. त्यानंतर झालेले म्युटेशन आणि निर्माण झालेल्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका आणि वेग अनेक पटींनी वाढला. त्यामुळे अधिक सतर्क राहणे आणि लसीकरणाचा वेग वाढवणे यावर भर असला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------

दिनांक रुग्णसंख्या सक्रिय रुग्ण पॉझिटिव्हिटी

7 मार्च 984 6689 14.59

7 एप्रिल 5651 46071 21.63

7 मे 2451 38481 14.62

7 जून 177 3943 3.70

Web Title: Positivity rate rises from 21% to 4% in two months - comforting