बारामतीत ‘पॉझिटिव्हिटी’ रेट कमी होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:23+5:302021-07-18T04:08:23+5:30

—उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची ...

The ‘positivity’ rate in Baramati needs to be reduced | बारामतीत ‘पॉझिटिव्हिटी’ रेट कमी होणे आवश्यक

बारामतीत ‘पॉझिटिव्हिटी’ रेट कमी होणे आवश्यक

—उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा, कोणत्याही परिस्थितीत पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, शासकीयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना बधितांशी संपर्क वाढला की रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाॅर्डनिहाय सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे, त्यांचे विलगीकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनास पूर्ण अधिकार दिले आहेत, स्थानिक पातळीवर प्रशासनाने त्याचा वापर करावा. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Web Title: The ‘positivity’ rate in Baramati needs to be reduced