शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 10:37 IST

अल्पवयीन मुलगी पीकअप गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरपटत नेल्याचेही समजते.

पुण्यातील कल्याणीनगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच, शिरूर तालुक्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी वरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे ( वय ३०) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी पीकअप गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरपटत नेल्याचेही समजते.

शिरूर तालुक्यातील वडगाव बांडे-आरणागाव  रोडवर पोलिस पाटील संतोष लेंडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला पीक अप गाडी चालवण्यासाठी दिली होती. पाटील स्वतः दुसऱ्या सीटवर बसले. याच रस्त्यावरून दुचाकीस्वार महेंद्र बांडे आणि अरुण मेमाणे हे न्हावरेगावाकडे जात होते. यावेळी मात्र पीक अप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसून दुचाकीवरील तरुण खाली पडले. यातील अरुण मेमाणे हा पीक अपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला गाडीने जवळपास ३० फुटांपर्यंत फरपटत नेले.  त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर पिक अप मालक घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेला. त्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. याबाबत मृत युवकाचा भाऊ सतिश विठ्ठल मेमाणे याने शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले मात्र अरुण मेमाणे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेने पुण्यातील कल्याणी नगर घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. पुण्यात देखील एका अल्पवयीन मुलाने पार्षे कारने दोघांना उडवले होते. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात