शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पूनावालांनी खरेदी केली पुण्यात ४६४ कोटींची प्रॉपर्टी; तेरा मजले घेतले , २८ कोटींचे मुद्रांक शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 07:29 IST

एपी ८१ टॉवर या १९ मजली व्यावसायिक इमारतीमधील तेरा मजले पूनावाला फिनकॉर्प कंपनीने खरेदी केले.

पुणे : पूनावाला फिनकॉर्प या ‘एनबीएफसी’ वित्तसंस्थेसाठी  मुंढव्यात ४६४ कोटी रुपये किमतीची इमारत खरेदी केली. प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून ही इमारत खरेदी करण्यात आली असून बांधकाम क्षेत्रातला हा अलीकडच्या काळातला पुण्यातला सर्वात मोठा व्यवहार आहे. 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)चे अदर पूनावाला हे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते पूनावाला फिनकॉर्प या कंपनीचेही अध्यक्ष आहेत़  त्यांनी कंपनीसाठी या वाणिज्यिक (कमर्शिअल) इमारतीचा खरेदी व्यवहार नुकताच पूर्ण केला. या करिता त्यांनी २७ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले.

एपी ८१ टॉवर या १९ मजली व्यावसायिक इमारतीमधील तेरा मजले पूनावाला फिनकॉर्प कंपनीने खरेदी केले. यापूर्वी कंपनीने याच इमारतीतील पहिला व दुसरा मजला खरेदी केला होता. आत्ताच्या खरेदीमुळे या टॉवरची एक पूर्ण विंग आता पूनावाला यांच्या मालकीची झाली आहे.

प्रिस्टीन प्रॉपर्टीजने सन २०१९ मध्ये एबीआयएल ग्रुपकडून १५० कोटी रुपयांमध्ये येथील ५ एकर जागा खरेदी केली. त्यानंतर अमर बिल्डरशी करार करून येथे १९ मजली इमारत उभारली. या १९ मजली टॉवरच्या एका विंगमधील दहा लाख स्क्वेअर फूट सेलेबल एरियातील ६० टक्के भाग पूनावाला यांच्या ताब्यात आहे. तर ३ लाख २० हजार स्क्वेअर फूट कार्पेट ऑफिस एरिया, ३२० कार आणि ८४९ बाईकसाठी राखीव पार्किंग आहे.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाPuneपुणे