पूनम महाजन यांचा सत्कार
By Admin | Updated: January 23, 2017 03:14 IST2017-01-23T03:14:13+5:302017-01-23T03:14:13+5:30
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार पूनम महाजन यांचा बालेवाडी येथे प्रभाग क्रमांक

पूनम महाजन यांचा सत्कार
बालेवाडी : भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार पूनम महाजन यांचा बालेवाडी येथे प्रभाग क्रमांक ९ भाजपच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. शहर युवा मोर्चा सरचिटणीस अमोल बालवडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाजन यांचा अमोल बालवडकर, प्रल्हाद सायकर व स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या हस्ते फुले पगडी, भाजीची टोपली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रकाश बालवडकर, उद्योजक राहुल बालवडकर, राहुल कोकाटे, गणेश कळमकर, संतोष तोंडे, संतोष जगदाळे, रोहिणी धनकुडे, सचिन पाषाणकर, नीलेश निम्हण आदी उपस्थित होते.(वार्ताहर)