शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

पुणे रेल्वे स्टेशनवरील पूल : ८० वर्षांपासून गर्दी सोसूनही खंबीर उभा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:41 IST

वर्ष १९३८... तेव्हा पुण्यातून काही वर्षांपासून रेल्वे धावत होती... प्रवाशांची संख्या शेकड्यामध्ये असेल... त्यावेळी ‘मी’ उभा राहिलो. थेट इंग्लंडमधून ‘ट्रस’ म्हणजे त्रिकोणीय रचना असलेला सांगाड्यासाठी लोखंड आणण्यात आले होते.

- राजानंद मोरेपुणे -  वर्ष १९३८... तेव्हा पुण्यातून काही वर्षांपासून रेल्वे धावत होती... प्रवाशांची संख्या शेकड्यामध्ये असेल... त्यावेळी ‘मी’ उभा राहिलो. थेट इंग्लंडमधून ‘ट्रस’ म्हणजे त्रिकोणीय रचना असलेला सांगाड्यासाठी लोखंड आणण्यात आले होते. आज प्रवाशांचा आकडा शेकड्यावरून लाखांवर पोहचला... पण ‘मी’ मात्र अजूनही तसाच उभा आहे... पूर्वीप्रमाणेच दणकट, पुढील अनेक वर्षांसाठी, प्रवाशांच्या सेवेसाठी...पुणे रेल्वे स्थानकावरील पहिला ८० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पादचारी पूल आजही आपल्या दणकटपणाची साक्ष देत उभा आहे. मुंबईत नुकत्यात पादचारी पूल कोसळल्याचा दुर्घटनेनंतर या पुलाबाबत लगेच चर्चा सुरू झाल्या. पण या पुलाची मजबुती आजही कमी झालेली नाही, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुंबई-पुणे रेल्वेलाईन १८५६ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर ३० वर्षांनी पुणे ते मिरज मार्ग पूर्ण झाला. १९२८ मध्ये मुंबई ते पुणे या शहरांदरम्यान पहिली एक्स्प्रेस ट्रेन धावली, ती म्हणजे डेक्कन क्वीन. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशी सुविधांमध्ये वाढ होत गेली. रेल्वे प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार, पहिला पादचारी पूल १९३८ मध्ये उभारण्यात आला. टप्प्याटप्प्याने फलाट वाढत गेल्यानंतर हा पूलही वाढविण्यात आला. सुमारे ५८ वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये राजा बहादुर मिल रस्त्याच्या पलीकडे या पुलाची दुसरी बाजू काढण्यात आली.रेल्वे स्थानकावर सुमारे १२ वर्षांपूर्वी दुसऱ्या पुलाची उभारणी झाली. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी तिसरा आणि मागील वर्षी सर्वांत मोठा चौथा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या पुलांमध्ये जुन्या पुलावरील गर्दी कमी झाली असली तरी ते प्रमाण तुलनेने कमी आहे.आजही अनेक प्रवाशांकडून जुन्या पुलाचाच वापर होत आहे. पूर्वी हा एकमेव पूल प्रवाशांना सेवा देत होता. लाखो प्रवाशांची ये-जा या पुलावरून होत होती. आजही ही स्थिती बदललेली नाही. पण त्यानंतरहीआज हा पूल तेवढाच दणकट असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.त्रिकोणीय रचना : इतर पुलांच्या तुलनेत हादरे बसतात..पुलाची बांधणी करण्यासाठी इंग्लंडमधून ‘ट्रस’ आणण्यात आले होते. ट्रस म्हणजे गर्डरच असतात, पण त्याची बांधणी वेगळी असते. त्रिकोणीय रचना असलेला लोखंडी सांगडा या पुलासाठी वापरण्यात आला आहे. दोन त्रिकोण एका पिनने जोडण्यात आले आहेत.ही रचना असलेला पूल ज्या खांबावर उभा आहे, ते खांब मात्र इथलेच आहेत. इंग्रजांनी बांधलेले रेल्वेचे बहुतेक पादचारी पूल या रचनेचे आहेत. त्रिकोणीय रचनेमुळे पुलावर येणारा ताण तिरक्या लोखंडी खांबातून (मेंबर) पिनमध्ये आणि नंतर उभ्या खांबांमध्ये जातो. त्यामुळे या पुलाला इतर पुलांच्या तुलनेत अधिक हादरे बसतात. हे या पुलांचे वैशिष्ट्य आहे.या पुलाचे वजन आताच्या पुलांपेक्षा अधिक आहे. प्रवासी ज्यावरून चालतात ते क्राँक्रिटचे असून त्यावर डांबर टाकलेले आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे कमी वजनाचे वजनाने हलके असलेले पूल असतात. मागील ५० वर्षांत मध्य रेल्वेत अशा प्रकारचा एकही पूल बांधला गेला नसल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला.जुन्या पुलावरून चालताना प्रवाशांना हादरे बसल्यासारखे वाटते. पण कोणत्याही पादचारी किंवा अन्य पुलांना अशा प्रकारचे कमी-अधिक हादरे बसत असतात. त्यामुळे या पुलाबाबतीत घाबरण्यासारखे काहीच नाही. या पुलाप्रमाणेच विभागातील सर्व पुलांची तपासणी वर्षभर सातत्याने होते. आधी सुपरवायझर, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी अशा तीन-चार स्तरांवर ही तपासणी केली जाते. हे रेल्वेच्या पुलांचे वैशिष्ट्य आहे.- सुरेश पाखरे, वरिष्ठ विभागीय अभियंता, मध्य रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणे