‘पूजा’ आत्महत्येच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:11 IST2021-02-12T04:11:46+5:302021-02-12T04:11:46+5:30

पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पुणे पोलिसांनी ...

‘Pooja’ demands inquiry into suicide | ‘पूजा’ आत्महत्येच्या चौकशीची मागणी

‘पूजा’ आत्महत्येच्या चौकशीची मागणी

पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पुणे पोलिसांनी करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

गुरुवारी (दि.११) ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, “संबंधित तरुणीचे प्रेमसंबंध एका मंत्र्याशी असल्याच्या क्लिप समाजमाध्यमांवर फिरत असल्याचे समजले आहे. एका तरुणीचा मृत्यू व त्याभोवती निर्माण झालेले संशयाचे वर्तुळ पाहता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करू नये़ त्यातील सत्य तत्काळ समोर आले पाहिजे़ ”

“एल्गारबाबतीत रोना विल्सनकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ज्यांनी तो अहवाल दिला आहे त्यांना रोनानेच काम दिले होते, असे या अहवालात सुरुवातीलाच म्हटले आहे. त्यामुळे हा अहवाल सरकारने फेटाळला,” असेही फडणवीस म्हणाले.

-------------------------------

Web Title: ‘Pooja’ demands inquiry into suicide