शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

उजनीला प्रदूषणाचा विळखा पाण्याचा रंग  हिरवा, परिसरात दुर्गंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 20:55 IST

उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचे शुक्लकाष्ट संपता संपत नसून, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे.

योगेश कणसेपुणे : उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचे शुक्लकाष्ट संपता संपत नसून, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा रंग प्रदूषणामुळे हिरवा झाला आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून त्याचा त्रास जलाशयाच्या किनारी राहणाºयांना गावांना सहन करावा लागत आहे.धरणाच्या जलाशयातील संपूर्ण पाण्यावर हिरव्यागार रंगाचे जणू आच्छादनच झाले आहे. या परिणाम  जलाशयात चालणाºया मासेमारीवर झाला आहे. पाण्यात अंग भिजल्यानंतर अंगाला खाज सुटत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे असून सध्या मासळी बाजारभाव तेजीत असताना जाळ्यात मासेही कमी सापडत असल्याने मच्छीमारही हवालदिल झाले आहेत.उजनी जलाशयावर हक्काचा पाहुणचार झोडण्यासाठी दर वर्षी न चुकता येणारे रोहित, चित्रबलाक या वर्षी आॅक्टोबर महिना संपून नोव्हेंबर उजाडला, तरी अद्यापही उजनीकडे फिरकले नाहीत. उजनी जलाशयातील वाढत्या प्रदूषणाने परदेशी स्थलांतरित पक्षी कायमची पाठ फिरवण्याचा धोका जलाशायाच्या प्रदूषणामुळे निर्माण झाला आहे.      उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे जलोद्भव असून दूषित झालेल्या पाण्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उजनी जलाशयातील पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी होतो. वारंवार असे दूषित पाणी पिकांना दिल्याने शेतमालासह शेतजमिनीच्या पोतावर त्याचा दूरगामी परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे शेतजमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. ४० वर्षांपूर्वी  उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यावर काही वर्षे जलाशयालगत राहणारे लोक व मच्छीमार पिण्यासाठी वापरत असत. मात्र, आता उजनी जलाशयाचे पाणी प्रदूषणाने हातात घेण्याच्याही लायकीचे राहिले नसल्याचे अनुमान जलतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.        गतवर्षी दुष्काळात उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच पाणीपातळी एकदमच खालावली. ११० टीएमसी इतकी क्षमता असलेल्या धरणात केवळ उणे ३९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. या पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरले. आजही पाण्याचा साठा शंभर टक्के आहे. पंचाहत्तर टक्के पाणी उजनीत नव्याने आले; शिवाय ५० टीएमसीहून अधिक पाणी अतिरिक्त झाल्याने वाहून गेले, तरीही उजनीतील  पाणी आज हिरवा तवंग पसरून कमालीचे प्रदूषित झाले आहे.       या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भीमा नदीच्या खोºयात मोठे औद्योगिकीकरण झाले. अनेक मोठ्या शहरांच्या सांडपाण्याचे विसर्जन या पाणलोट क्षेत्रातील नद्यांत होत आहे. या मैलामिश्रित सांडपाण्याबरोबरच औद्योगिक कंपन्यांचीही टाकाऊ रसायने पर्यायाने उजनीच्या पाण्यात मिसळत आहेत. या प्रदूषणाने उजनी धरणाच्या पाण्यात आढळणाºया जैवसाखळीतील महत्त्वाच्या अनेक पाणवनस्पती नामशेष झाल्या आहेत. याचा मोठा फटका पाण्यातील जलचरांना बसला असून गोड्या पाण्यात पूर्वी आढळणाºया माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. आज अपवादाने एखादादुसरा माशाची जात आढळून येते. त्याचे सापडण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असून, घाण पाण्यात जो सर्वाधिक ‘तिलापी’ मासा ज्याचे प्रचलित नाव चिलापी आहे, तो उजनीत मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच उजनी धरणाच्या पाण्यातील वाढत्या घातक प्रदूषणाने उजनीतील जैववैविध्यावर दूरगामी परिणाम झाला आहे. यामुळे अनेक जाती-प्रजातींचे पक्षी उजनी धरणाच्या जलाशयाकडे पाठ फिरवू लागले आहेत.

टॅग्स :Ujine Damउजनी धरणpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण