पालिका पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत

By Admin | Updated: January 19, 2015 01:44 IST2015-01-19T01:44:21+5:302015-01-19T01:44:21+5:30

महानगरपालिकेच्या कोथरूड येथील प्रभाग क्रमांक २६ व हडपसर येथील प्रभाग क्रमांक ४६च्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले.

Polling process in peaceful municipality bypoll | पालिका पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत

पालिका पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत

कोथरूड/हडपसर : महानगरपालिकेच्या कोथरूड येथील प्रभाग क्रमांक २६ व हडपसर येथील प्रभाग क्रमांक ४६च्या पोटनिवडणुकीसाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. कोथरूडच्या प्रभागामध्ये ४२.३३ टक्के तर हडपसरच्या प्रभागामध्ये ४८.४ टक्के इतके मतदान झाले. दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग क्रमांक २६ मधील काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर व प्रभाग क्रमांक ४६मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी पक्षांतर केल्याने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्या दोन जागेकरिता पोटनिवडणूक झाली. सकाळपासून मतदानाला संथगतीने सुरुवात झाली होती. कोथरूडमध्ये सकाळी ९.३० वाजता ६ टक्के मतदान झाले होते. दुपारी ते १५ टक्क्यांपर्यंत गेले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४२.३३ टक्के मतदान झाले. रविवार सुट्टीचा दिवस असूनसुद्धा दुपार पर्यंत या भागात मतदानात निरुत्साह जाणवत होता. मतदान केंद्रातील खोल्या रिकाम्याच होत्या. शेवटच्या दोन तासांतच ७ टक्के मतदान झाले. कोणत्याही ठिकाणी गैरप्रकार आढळला नाही, एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय दहीभाते यांनी दिली.
हडपसरच्या प्रभागामध्ये दुपारी साडेअकरापर्यंत १५ टक्के झाले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत
३४ टक्के व शेवटी ४८.४ टक्के
मतदान झाले.
या प्रभागात एकूण २९,१११ मतदार होते त्यापैकी १२,३२४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी व काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना व भाजपाने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. तर जनविकास आघाडी करून प्रमोद भानगिरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. मनसेकडून उमेदवारच नसल्याने प्रमुख चार पक्षांच्या उमेदवारांसह एक अपक्ष उमेदवार रिंगणात होता.

Web Title: Polling process in peaceful municipality bypoll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.