पुण्यातील घटनांबाबत राजकारण्यांचे मौन
By Admin | Updated: June 6, 2014 23:46 IST2014-06-06T23:46:46+5:302014-06-06T23:46:46+5:30
मुस्लिम तरुणाची झालेली निर्घृण हत्या या घटनांचा साधा निषेधही शहराच्या महापौर किंवा पालकमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.

पुण्यातील घटनांबाबत राजकारण्यांचे मौन
>पुणो : कथित फेसबुक प्रकरणानंतर पुण्यामध्ये निर्माण झालेला तणाव आणि मुस्लिम तरुणाची झालेली निर्घृण हत्या या घटनांचा साधा निषेधही शहराच्या महापौर किंवा पालकमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. तरीदेखील शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुस्लिम समाजाने सर्वतोपरी सहकार्य केल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजहर तांबोळी यांनी स्पष्ट केले.
मोहसीन शेख हा नमाज झाल्यानंतर रात्री डबा घेऊन खोलीवर जात असताना त्याला 15 ते 2क् जणांच्या टोळीने मारहाण केली. डोक्यामध्ये बॅट मारून त्याला जखमी केल्यानंतरही मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सहका:यालाही मोठय़ा प्रमाणावर मारहाण झाली. केवळ चुकीचा संदेश पसरत गेल्यामुळे मोहसीनला प्राण गमवावे लागले. या सर्व घटना घडूनही हडपसर व शहरातील जवळजवळ सर्वच भागांत शांतता ठेवण्याचे प्रयत्न ऑल मस्जिद अॅक्शन कमिटी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड या संघटनांनी केले. तांबोळी म्हणाले, धार्मिक स्थळांचे नुकसान आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींमध्ये त्रुटी ठेवल्या.
हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक असलेल्या धनंजय देसाई व प्रमोद मुतालीक यांना यापूर्वीच अटक झाली असती, तर कदाचित हा अनर्थ टळला असता. पुण्यामध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर त्रस होऊनही मुस्लिम समाजाने संयम राखलेला आहे. तरीदेखील शहरातील कोणताही राजकीय नेता, पालकमंत्री, महापौर परिस्थिती समजून घेण्यासाठी आले नाहीत. तसेच, त्यांनी साधा निषेधही नोंदवलेला नाही. शांतता प्रस्थापित करून मुस्लिम समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता तांबोळी यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून व्यक्त केली. (प्रतिनिधी)