शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात दांभिकता ठासून भरलेली: विनय सहस्त्रबुध्दे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:13 IST

सामाजिक संस्था, संघटनांसह राजकारणातही सध्या नेतृत्वाची पोकळी...

ठळक मुद्देअशोक कुकडे यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान

पुणे : सामाजिक कामातील लोकांनीही आखीव-रेखीव असले पाहिजे. केवळ चांगले असून चालत नाही तर चांगले दिसावेही लागते. ‘चारित्र्य’ ही व्यापक संकल्पना आता ‘आऊट ऑफ फॅशन’ झाली असून त्याच्याकडे कालविसंगत संकल्पना असे बघितले जाते. समाजात दांभिकता दिसते. राजकारणात तर ती ठासून भरली आहे. बोलायचे एक आणि करायचे एक, हे लोकांमध्ये रूढ होतेय. हे चित्र बदलायला हवे, अशी अपेक्षा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केली. चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक अशोक कुकडे यांना सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते रविवारी राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, पुणे पिपल्स को- ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, अ‍ॅड. मंगेश गांधी, श्रीधर गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध शाळांमधील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.नागरिकता सुधारणा कायद्याचा संदर्भ देत सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘कागज नही दिखायेंगे’ असे काही क्रांतीकारी म्हणत आहेत. पण समाजात अनुशासनाला महत्व असते. प्रत्येक ठिकाणी कागदपत्रांची गरज भासत असते. देशभक्ती हा रोजच्या जगण्याचा विषय असतो. संस्थाबांधणी म्हणजे केवळ इमारती उभी करणे नव्हे. तर संस्थेचे समाजाशी असलेले परस्परसंबंध, दीर्घपल्याचा विचार, मिशन अशा विविध मुल्यांचा संस्थाबांधणी म्हणून विचार करायला हवा. यापुढे २०० वर्षांनी सांगण्यासारख्या संस्था आज उभ्या राहत आहेत का, हेही विचारात घ्यायला हवे. नेतृत्त्वशास्त्र हा विषय दुर्देवाने केवळ कॉर्पोरेट क्षेत्रात अधिक बोलला जातो. पण आपल्या घरामध्ये नेतृत्व असते. संस्था, संघटनांसह राजकारणातही सध्या नेतृत्वाची पोकळी दिसून येते. त्यामुळे नेतृत्वशास्त्राची सर्वंकष मांडणी हवी. ‘नावापुढे देभ असे लिहून देशभक्त होत नाही. ते वागणे, बोलणे, मानसिकतेतून दिसायला हवे,असे हेडगेवार म्हणत. समाज स्वस्थ कसा होईल, हा प्रश्न आहे. आज अनेक विकृती आहेत. सामाजिक प्रदुषण दुर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. परस्पर विचारांमध्ये तफावत असली तरी मैत्री असायला हवी. स्वस्थ समाजाची निर्मिती यातूनच होईल’, असा आशावाद कुकडे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना सन्मानातून प्रोत्साहन मिळत असल्याने असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत, असे डॉ. संचेती यांनी नमुद केले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSocialसामाजिक