राजकारण्यांना धडा शिकविण्याची गरज
By Admin | Updated: March 21, 2015 00:22 IST2015-03-21T00:22:58+5:302015-03-21T00:22:58+5:30
राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

राजकारण्यांना धडा शिकविण्याची गरज
पुणे : धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे षडयंत्र राजकारण्यांकडून सुरू आहे. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
अॅड. श्रीधर कसबेकर लिखित ‘अॅड. राम जेठमलानी- ए डायनामिक पर्सनॅलिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन जेठमलानी यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयातील अशोका सभागृहात हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. हेरंब गानू, अॅड. योगेश पवार, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार साधना बोरकर, संजीव जाधव, सदस्य अॅड. सुधीर मुळे उपस्थित होते.
जेठमलानी म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्मनिरपेक्ष नागरिक असल्याचा अभिमान वाटायला हवा.
मी स्वत: धर्मनिरपेक्ष नागरिक आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या धर्माप्रमाणेच इतरांचा धर्मही मोठा आहे, हे मानन्याचा मोठेपणा प्रत्येकामध्ये असायला हवा. स्वत:च्या धर्मातील चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगण्याबरोबरच त्यातील ज्ञान आणि शिक्षण घ्यायला हवे. पूर्वी वकिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदरार्थी होता. लोकांच्या हितासाठी लढा देणाऱ्या वकिलांनी पक्षकारांकडून पैसे घेणे हे लाच घेण्यासारखे समजले जात असे.
(प्रतिनिधी)
खंत वाटते...
४वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना सांगितले जात नाही. वकील असण्याबरोबरच राजकारणी, कायद्याचा शिक्षक आणि पत्रकार अशा भूमिकाही बजावल्याचे सांगत जेठमलानी यांनी राजकारणी असल्याबद्दल खंत वाटत असल्याचे नमूद केले.