हेल्मेटसक्तीवर रंगला राजकीय कलगीतुरा

By Admin | Updated: February 7, 2016 04:02 IST2016-02-07T04:02:08+5:302016-02-07T04:02:08+5:30

हेल्मेटसक्तीच्या निषेधार्थ आयोजिण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हेल्मेटसक्तीच्या विषयापेक्षा राजकीय कलगीतुरा रंगल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक

Political turmoil on helmet | हेल्मेटसक्तीवर रंगला राजकीय कलगीतुरा

हेल्मेटसक्तीवर रंगला राजकीय कलगीतुरा

पुणे : हेल्मेटसक्तीच्या निषेधार्थ आयोजिण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हेल्मेटसक्तीच्या विषयापेक्षा राजकीय कलगीतुरा रंगल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला. शिवसेना हेल्मेट सक्तीच्या विषयावरून परिवहनमंत्री दिवाकर रावतेंचा राजीनामा मागणार का, असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला, तर पुणेकरांनी भाजपाचे आठ आमदार निवडून देऊनही त्यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निम्हण यांनी केली.
निम्हण यांच्या वक्तव्याला आमदार कुलकर्णी यांनीही सडेतोड उत्तर देत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे त्या म्हणाल्या. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना त्यांचा राजीनामा मागणार का? पुणेकरांना न्यायालयात जाण्याचा सल्ला रावतेंनी दिला.
पुणेकरांच्या वतीने ते लोकप्रतिनिधी म्हणून न्यायालयात बाजू मांडणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपावर आगपाखड करण्याऐवजी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी रावतेंना घेराव घालावा, असे त्या या वेळी म्हणाल्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात झालेल्या सक्तीला सर्वपक्षीय आमदारांनी विरोध केला होता. विधानसभेमध्ये याबाबत आवाज उठवत ही सक्ती रद्द करण्यात आली. मात्र पुणेकरांनी निवडून दिलेले आठही आमदार पुणेकरांचा प्रश्न विधानसभेत मांडत नाही. नैतिक जबाबदारीचे भान ठेवून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा
द्यावा, असे विनायक निम्हण या वेळी म्हणाले.

Web Title: Political turmoil on helmet