पिंपरीतील राजकारणात घराणेशाही!

By Admin | Updated: February 8, 2017 03:04 IST2017-02-08T03:04:17+5:302017-02-08T03:04:17+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीत सर्वच पक्षांत घराणेशाही कायम असल्याचे दिसून येत आहे. काहींनी आपल्या मुलास, मुली,तर काहींनी

Political politics in the family! | पिंपरीतील राजकारणात घराणेशाही!

पिंपरीतील राजकारणात घराणेशाही!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीत सर्वच पक्षांत घराणेशाही कायम असल्याचे दिसून येत आहे. काहींनी आपल्या मुलास, मुली,तर काहींनी आपल्या भावास, चुलत भावास, पत्नीस निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. आजी-माजी आमदार खासदारांच्या घरातही घराणेशाही दिसून येत आहे.
महापालिका निवडणूकीतही काही प्रमाणात घराणेशाही दिसून येत आहे. काहींनी आपल्या मुलास, मुली,तर काहींनी आपल्या भावास, चुलत भावास, वहिनीस, पत्नीस निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसेच काहींनी आपल्या नातेवाईकांनाही तिकीटे दिली आहेत. तसेच काहींच्या घरात दोन उमेदवार वेगवेगळ्या पक्षात असल्याचे दिसून येत आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांचे पुतने निलेश बारणे, माजी खासदार गजानन बाबर यांच्या वहिनी शारदा बाबर, आमदार लक्ष्मण जगताप यांचे चुलत बंधू श्याम जगाताप, आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांचे चिरंजिव विक्रांत लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची पत्नी उषा वाघेरे, भाजपाचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांची कन्या तेजस्विनी दुर्गे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या पत्नी सोनम गव्हाणे, माजी महापौर हनुमंत भोसले यांचे चिरंजीव राहुल भोसले, राष्ट्रवादीचे नेते नाना शितोळे यांचे चिरंजीव अतुल शितोळे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे यांचे चिरंजीव दीपीका ढगे, स्थायी समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर भालेराव यांच्या पत्नी प्रतिभा भालेराव, माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांच्या पत्नी शोभा वाल्हेकर, शिवसनेचे उपशहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांच्या पत्नी मंगल
वाल्हेकर, माजी नगरसेवक
रघुनाथ वाघ यांच्या पत्नी रजनी
वाघ, माजी नगरसेवक हनमंत
गावडे यांचे चिरंजीव विजय गावडे
हेही रिंगणात आहेत. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे असे एकाच घरातील दोन भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Political politics in the family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.