राजकीय फलक उतरविले

By Admin | Updated: September 13, 2014 23:53 IST2014-09-13T23:53:38+5:302014-09-13T23:53:38+5:30

कार्यकत्र्यानी लावलेल्या जाहिराती, फ्ल्केस, बोर्ड, बॅनर व होर्डिग 24 तासांच्या आता काढण्याच्या सूचना पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Political plaque removed | राजकीय फलक उतरविले

राजकीय फलक उतरविले

पुणो : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्ष तसेच कार्यकत्र्यानी लावलेल्या जाहिराती, फ्ल्केस, बोर्ड, बॅनर व होर्डिग 24 तासांच्या आता काढण्याच्या सूचना पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होताच, कुमार यांनीसर्व विभागप्रमुख तसेच क्षेत्रीय अधिका:यांची तातडीची बैठक घेऊन आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. 
राजकीय पक्षांचे बॅनर्र, होर्डिग, ङोंडे, फलक तातडीने स्वतंत्र पथके नेमून शनिवारीही कारवाई पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिका:यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच आचारसंहिता कारवाईबाबत कुमार यांनी अधिका:यांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
 
4महापालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून शहरात आज दिवसभरात या राजकीय जाहिराती काढण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात आली. 
4आज दिवसभरात तब्बल पाच हजारांहून अधिक अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, बॅनर काढण्यात आल्याची माहिती या विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी दिली. त्यात प्रामुख्याने बोर्डाचे सर्वाधिक प्रमाण होते. 
4या कारवाईसाठी प्रशासनाकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर 15 पथके नेमण्यात आली होती. रात्री उशिरार्पयत ही कारवाई सुरू ठेवण्यात आल्याचे दहिभाते म्हणाले. तसेच, उद्या (रविवारी) ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Political plaque removed