शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

राजकीय पक्षांनी आचार संहितेचे उल्लंघन करु नये : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 8:34 PM

कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी काळजी घ्यावी.त्याचप्रमाणे राजकीय मेळावे, जाहीर सभा याबाबतीत आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात.

ठळक मुद्देआचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सी-व्हिजिलअ‍ॅपची निर्मिती

पुणे: लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू झाली असून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्न धर्मीय किंवा भिन्न भाषिक यांच्यात मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्य निर्माण होईल, अशा प्रकारच्या कृत्यामध्ये भाग घेवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी दिले. तसेच सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहन केले.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राजकीय पक्षांची बैठकीत नवल किशोर राम बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राम यांनी सी-व्हीजील या अ‍ॅपबाबतही विस्तृत माहिती दिली. निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी या सी-व्हिजिलअ‍ॅपची निर्मिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे.सी-व्हिजिल हे अ‍ॅप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणा-या नागरिकांसाठी एक अस्त्र ठरणार आहे. सर्व नागरिक या अ‍ॅपचा वापर करु शकतात. स्वतंत्र व निःपक्षपातीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व नागरिक सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात, असेही राम यांनी नमूद केले. संदीप पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी काळजी घ्यावी.त्याचप्रमाणे राजकीय मेळावे, जाहीर सभा याबाबतीत आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात.दरम्यान ,जिल्हाधिकारी राम यांनी आचार संहितेच्या काळात काय करावे आणि काय करु नये, याबाबत विस्तृत सादरीकरण केले.तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचप्रमाणे अजित रेळेकर यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापन या विषयावर, सुहास मापारी यांनी एक खिडकी योजनेबाबत तर टपाली मतपत्रिकेबाबत सुनील गाढे यांनी सादरीकरण केले.

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण