शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्त, अधीक्षकांच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप; ‘वेटिंग’चे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 01:54 IST

Police Transfers News: वाहतूक विभाग हा सर्वाधिक मलईचे पोस्टिंग समजले जात होते. पुण्यात एका सहायक आयुक्तांची बदली थेट वाहतूक शाखा अशी आल्याने तेव्हा चर्चेचा विषय झाला होता.

विवेक भुसे  

पुणे : राज्यात सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून त्यातील अनेकांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यांची नियुक्तीन करता त्यांना प्रतिक्षेत ठेवले जात आहे, त्याचवेळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या आता आयुक्तालयात न करता थेट परिमंडळात होऊ लागल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांचा संकोच होऊ लागला आहे.

पूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची विशेषत: पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या बदल्या या प्रामुख्याने त्या त्या जिल्ह्यात, पोलीस आयुक्तालयात होत असत. त्यानंतर तेथील प्रमुख त्या अधिकाºयांना कामाच्या सोयीनुसार परिमंडळ अथवा उपविभागीय अधिकारीपदावर नियुक्त करीत असत. मात्र, गेल्या दशकापासून याही नियुक्त्या थेट पदावर होऊ लागल्या. आघाडी सरकारच्या काळात हा प्रकार प्रामुख्याने सुरु झाल्याचे सांगितले जाते.

वाहतूक विभाग हा सर्वाधिक मलईचे पोस्टिंग समजले जात होते. पुण्यात एका सहायक आयुक्तांची बदली थेट वाहतूक शाखा अशी आल्याने तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर अशा थेट नियुक्त्या होण्याचे प्रमाण वाढत गेले. या महाविकास आघाडी सरकारमधील पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करताना अनेक अधिकाºयांच्या बदल्या केल्याची तळटीप दिली जात आहे. मात्र त्यांना बदलीचे ठिकाण न देता वेटिंगवर ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळेच असे प्रकार होऊ लागल्याचे सांगितले जात आहे.‘‘पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना त्यांच्या हाताखालील अधिकाºयांकडून कामे करुन घ्यायची असतात. त्यामुळे कोठे कोणता अधिकारी चांगले काम करु शकेल, हे त्यांना अधिक चांगले माहिती असते. त्यामुळे कोणाची कोणत्या पदावर नियुक्ती केली जावी, हा अधिकार पोलीस आयुक्त, अधीक्षकांचा आहे. या स्वातंत्र्याचा संकोच केला जाऊ नये,’’ -अजित पारसनीस, निवृत्त पोलीस महासंचालक

टॅग्स :Policeपोलिस