शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:50 IST

चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’

ठळक मुद्देगमतीशीर म्हणींची चर्चा जनतेकडून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख..

तेजस टवलारकर पुणे : ‘आम्ही कसेबसे पंक्तीत घुसलो आणि बुंदी संपली, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्र्यांची खुर्ची काढून सतरंजी टाका आणि सगळे बसा, मंदिरात गेलो आणि भंडाराच संपला, बाहेर आलो तर चप्पल चोरीला गेली, चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’ सध्या सुरू असलेल्या राज्याचा राजकारणावरून या प्रकारच्या गमतीशीर म्हणींची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.सध्या राज्याच्या राजकारणात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. रोज नवनवीन चर्चा आणि बातम्या समोर येत आहेत. सर्वत्र राजकारणावरच चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. याच राजकीय स्थितीवरून सोशल मीडियावर चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातून रोजच  नवनवीन म्हणींचा उदय होत असून जनतेकडून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेतले जात आहे.   राज्याच्या सत्तास्थापनेवरून सर्वच पक्षांत खलबते सुरू आहेत. फेसबुक, व्हॉट्स्अ‍ॅप गु्रपवर राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या सोयीचे व्हिडीओ, फोटो, म्हणी, व्यंगचित्रे, मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत. यातून आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न  कार्यकर्ते करीत आहेत. अनेक विनोदी मेसेज फिरत असले तरी त्यातून राजकारणाची प्रतिमा किती खालावलेली आहे, हे या मेसेजवरून दिसून येते. याचबरोबर व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून सध्याची राजकीय स्थिती दाखवली जात आहे..............ाुने व्हिडिओ शेअर करण्यावर भर राज्याच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. अनेक वर्षे एकामेकांच्या विरोधात बोलणारे एकत्र येण्याच्या मार्गवर आहेत. यावरूनच  पूर्वी ऐकामेकांवर केलेले आरोप प्रत्यारोपांचे व्हिडीओ दाखवून आता कशी भूमिका बदलली, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसिद्धीच्या झोतात आणले तोच सोशल मीडिया आता डोकेदुखी ठरत आहे. ..............राष्ट्रपती राजवटीवर विनोदी मेसेज व्हायरलकोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली सदस्यसंख्या जुळवता आली नाही; त्यामुळे  राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यावरूनसुद्धा विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत.  ‘राष्ट्रपती राजवटीत लग्न करायला चालते का? राष्ट्रपती राजवटीतही सूर्य पूर्वेकडूनच उगवला.’ या प्रकारचे विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत......व्यंगचित्रांनी घातली भर सोशल मीडियावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून सद्य:स्थिती दाखवली जात आहे. रोज नवनवीन व्यंगचित्र्े प्रसिद्ध केली जात आहेत. यातून मनोरंजनाबरोबरच हास्यसुद्धा निर्माण होत आहे. सर्वच माध्यमांवर व्यंगचित्रे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSocial Mediaसोशल मीडिया