शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला दीड कि.मी. नेले फरफटत, धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:51 IST

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली़ ते बोनेटवर पडले असताना त्या अवस्थेत त्यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली़ ते बोनेटवर पडले असताना त्या अवस्थेत त्यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.दीपक सोनी हा शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चतु:शृंगी पायथ्याजवळ येणार असल्याची माहिती खरात यांना मिळाली. त्यानुसार ते वरिष्ठांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी गेले. चतु:शृंगी पायथ्याजवळ अनगळ पार्कसमोर सोनी हा मोटारीमध्ये बसल्याचे त्यांना दिसले. खरात आणि त्यांचे सहकारी त्याच्याकडे चौकशीसाठी गेले. त्याला गाडीची काच खाली करायला लावून, ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगितले. याच वेळी सोनीने त्याची मोटार सुरू करून थेट खरात यांच्या अंगावर घातली; त्यामुळे ते बोनेटवर आदळले. त्यानंतरही सोनी हा न थांबता तशीच जोरात मोटार पुढे घेऊन जात होता़ खरात यांनी आरडाओरडा करून थांबविण्यास सांगितले. तरीही त्याने त्यांच्या जिवाची पर्वा न करता मोटार तशीच पुढे नेली. हा सर्व प्रकार बघून रस्त्यावरील नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. सोनी याने खरात यांना सुमारे १० मिनिटे दीड किलोमीटर फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला गंभीर जखमा झाल्या. पाषाण रस्त्याला नेल्यानंतर त्याने खरात यांना बोनेटवरून खाली पडले़ त्यानंतर तो तेथून पळून गेला. खरात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनी आणि त्याच्या साथीदाराला अद्याप अटक केलेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे