शहरातील दोन लाख बालकांना पोलिओ डोस

By Admin | Updated: January 18, 2016 01:02 IST2016-01-18T01:02:46+5:302016-01-18T01:02:46+5:30

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी शहरातील १ लाख ८७ हजार ३८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

Polio doses to two lakh children in the city | शहरातील दोन लाख बालकांना पोलिओ डोस

शहरातील दोन लाख बालकांना पोलिओ डोस

पिंपरी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी शहरातील १ लाख ८७ हजार ३८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
पहिल्या सत्रातील मोहिमेचे आयोजन महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले. महापालिका हद्दीतील ७९१ लसीकरण केंद्रांमार्फत ८ प्रभारी आणि ४८ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली १६५ पर्यवेक्षक, ३९७१ कर्मचाऱ्यांमार्फत मोहीम राबविण्यात आली. रोटरी क्लबचे स्वयंसेवक, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अंगणवाडीसेविका आणि इतरांचे सहकार्य मोहिमेसाठी लाभले.
मोहिमेचे उद्घाटन महापौर धराडे यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथील महापालिका दवाखान्यात करण्यात आले. या वेळी नगरसदस्य नवनाथ जगताप, डॉ. साळवे, डॉ. डांगे आणि वैद्यकीय अधिकारी, डॉ. एस. के. जैन उपस्थित होते. पाच वर्षाखालील बालकांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
पालिकेची रुग्णालये, दवाखाने, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी आदी ६८८ ठिकाणी केंद्रांची व्यवस्था होती. बसस्थानक, रेल्वे स्टेशनमध्ये ४७ ट्रांझिट केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांचे पाल आदी ठिकाणी ५६ फिरत्या केंद्रांची व्यवस्था होती. बॅनर, वॉल पेंटिंग आदीद्वारे मोहिमेचा प्रचार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Polio doses to two lakh children in the city