त्यापैकी १८१२ बालकांना लसीकरण करण्यात आले म्हणजे ९७.१० टक्के इतके लसीकरण झाले. लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनीताई पवार व वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत आंधळे, डॉ.अभिष भुजबळ, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी, शकील तांबोळी, ज्योती महागरे आदी कर्मचारी वर्गासह वाल्हे ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत पवार, हभप अशोक महाराज उपस्थित होते. दरम्यान, या लसीकरण मोहिमीत वाल्हे आरोग्य केंद्राच्या बावीस बूथवर टीम कार्यरत होत्या. त्यामध्ये पिंगोरी, कवडेवाडी, आडाचिवाडी, दौंडज, वागदरवाडी, सकाळवाडी, राख, नावळी, पिसुर्टी या ठिकाणी कार्यरत होत्या त्याच बरोबर ऊस तोड चालू असलेल्या फडा मध्ये व विट भट्टी वर जाऊन ही लसीकरण करण्यात आले अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे यांनी दिली.
--
फोटो क्रमांक : ०१ वाल्हे आरोग्य केंद्र लसीकरण
फोटो ओळ. वाल्हे आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण करते वेळी डॉ. प्रशांत आंधळे,सरपंच अमोल खवले,हनुमंत पवार,पर्यवेक्षक राजेंद्र दळवी,शकिल तांबोळी,ज्योती महागंरे आदी