शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सायंकाळी 'वॉक' करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; १०० हून अधिक नागरिकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 22:29 IST

कडक लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणे महागात; ५४ हजार पाचशे रुपयांचा दंड केला वसूल....

धायरी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन असतानादेखील सायंकाळी ' वॉक'ला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यामुळे, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर सिंहगड रस्ता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगांव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारील ट्रॅकवर सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरा घालून तब्बल १०९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत ५४ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना वारंवार केले जात आहे. मात्र काहीजण तरीही या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत सायंकाळी वॉकला घराबाहेर पडतात. अशा व्यक्त्तींविरोधात सिंहगड रस्ता पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच यापुढील काळात संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी सक्त ताकीदही दिली. 

सध्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी होत आहे. मात्र अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र सायंकाळी फिरायला जाणाऱ्या पुणेकरांच्या डोक्यात ही बाब शिरत नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच सिंहगड रस्ता पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्याविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक' करून दंड वसूल केला. यावेळी पुरुषांशिवाय अनेक महिलाही फिरताना आढळून आल्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर, नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली. 

.......यापुढे अशी चूक करणार नाहीपोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला असताना काही नागरिकांनी स्वतः पुढे येऊन यापुढे अशी चूक करणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले.  वडगांव  बुद्रुक, माणिकबाग, सनसिटी, गोयल गंगा आदी परिसरातील नागरिक याठिकाणी सायंकाळी फिरण्यास आले होते. 

.......काही व्यक्ती विनाकारण फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा कोणी विनाकारण घराबाहेर फिरत असेल तर त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.   - देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षकसिंहगड रस्ता पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका