शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंच्या टोळीत पोलीस शिपाईही, पिस्तुलाच्या धाकाने लुटणाऱ्या चौैघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:42 IST

चौफुला (ता. दौंड) येथे चार महिन्यांपूर्वी दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल लुटणा-या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे.

यवत - चौफुला (ता. दौंड) येथे चार महिन्यांपूर्वी दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल लुटणा-या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. एक आरोपी अहमदनगर पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.चौफुला (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या मंथन स्पन पाईप दुकानामध्ये ४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास पाईप घेण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दुकानमालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. दुकानाच्या गल्ल्यातील व खिशातील ५० हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने चोरीला गेलेल्या मोबाईलच्या दिशेने तपास केला असता या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यातील अल्ताफ चाँदसाहब पठाण (वय २१, रा. मुळानगर, ता. राहुरी, जि. नगर), आदित्य सुभाष बेल्हेकर (वय २४, रा. डिग्रस, ता. राहुरी), महेश अंकुश खोरे (वय २६, रा. गार, ता. श्रीगोंदा, जि. नगर), विकास सुरेश अडागळे (वय २८, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) अशी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी आदित्य बेल्हेकर अहमदनगर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून क्युआरटीमध्ये कार्यरत आहे.गुन्ह्यातील दोन आरोपी मात्र अद्याप फरारी आहेत. अटक केलेल्या चार आरोपींना गुरुवारी दौंड येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने (दि. ९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी घनश्याम शिवराम भापकर (वय २८, रा. वाखारी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यापूर्वीच यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना चोरीला गेलेले मोबाईल आरोपी महेश खोरे याच्याकडे असल्याचे तपासात उघड झाले होते. यानंतर आरोपी खोरेकडे अधिक चौकशी केली असता एकूण सहा आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.चौफुला येथे पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाºयाला लुटल्याच्या चार महिन्यांपूर्वीच्या घटनेचा लागला तपासचार महिन्यांनंतर चार आरोपींच्या आवळल्या मुसक्याकटात एकूण सहा आरोपींचा सहभाग, दोन आरोपी फरारी

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा