शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीसमोर मारहाण : आरोपीला अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 18:37 IST

सध्या पुणे शहर भागातील पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. त्याला आठवडा उलटण्याची आतच दुसरी घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीसमोर मारहाण, पुण्यातील मीठगंज भागातील घटना खडक पोलीस चौकीतील घटना, आरोपीला अटक

पुणे : रस्त्यावर आरडाओरडा करू नकोस या पोलिसाने केलेल्या सूचनेचा राग येऊन संबंधित  पोलीस कर्मचाऱ्यालाच  मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला असून  आरोपी सुरेश आहुजी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एस. एन.लोहोमकर यांनी खडक पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. 

 

   याबाबत घडलेली घटना अशी की, मीठगंज पोलीस चौकीसमोरील जीत वाईन्स दुकानासमोर सोमवारी (दि.५) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी सुरेश आहुजी हे आरडाओरडा करत होते. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करू नकोस असे पोलीस नाईक एस एन लोहोमकर यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने लोहोमकर यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही त्या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर लाथ मारली. यात त्यांचा हात दुखावला आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आहुजी याला अटक केली आहे. सध्या पुणे शहर भागातील पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. त्याला आठवडा उलटण्याची आतच दुसरी घटना समोर आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे