शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आई वडिलांना शेतात डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलीस कर्मचाऱ्याची अमानुष मारहाण; अवसरी बुद्रुक येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 18:14 IST

या घटनेची गंभीर दाखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पुण्यामध्ये तडकाफडकी बदली

ठळक मुद्देहा व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांची पोलिसाच्या या अमानवी कृत्याबद्दल तीव्र नाराजी

आंबेगाव : अवसरी बुद्रुक येथून गावडेवाडी येथे एक तरुण नातेवाईक मित्रासमवेत वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून जात असताना गावडेवाडी फाटा येथे पोस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित तरुणाची मोटरसायकल अडवून त्याला अमानुषपणे मारहाण केली. ही घटना शुक्रवारी ( दि. ३ ) दुपारी घडली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ एका सजग नागरिकाने सोशल मीडियावर टाकला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी पोलिसाच्या या अमानवी कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दाखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची पुण्यामध्ये  तडकाफडकी बदली करत त्यावर कारवाई केली आहे. 

अवसरी बुद्रुक येथून गावडेवाडी येथे एक तरुण नातेवाईक मित्रासमवेत वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून जात असताना गावडेवाडी फाटा येथे पोलिस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित तरुणाची मोटरसायकल अडवून त्याला मारहाण केली. संबंधित तरुण माझे आई-वडील शेतात काम करत आहे . त्यांना जेवणाचा डबा घेऊन चाललो आहे असे सांगूनही पोलीस मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या पोलिसाने अक्षरक्ष: काठीने त्या तरूणाला मारहाण केली . त्याने पोलिसाचे समाधान न झाल्याने तरुणाच्या थोबाडीत देखील मारली. एवढे होऊनही संबंधित तरुण सॉरी म्हणूनही पोलिसाच्या हातापाया पडत होता, 'आम्ही पण माणूस आहे ' अशी विनंती करूनही पोलीस मात्र त्याला मारत होता . हा व्हिडीओ सोशल मीडियावर एका सजग नागरिकाने टाकला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.         मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित पोलिसाने केलेल्या मारहाणी बद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.आंबेगाव तालुक्यात उमटले तीव्र पडसाद यापूर्वी बोरवाडी येथे एका किराणा दुकानदाराच्या कर्मचाऱ्यांना अशीच मारहाण केली होती. 

टॅग्स :ambegaonआंबेगावPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस