भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलिसांनाच दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST2021-07-03T04:07:51+5:302021-07-03T04:07:51+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: सोमवारी सायंकाळी ७ वाजता मंचर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी झाली होती. त्या वेळी पोलीस ...

The police who went to settle the dispute were forced | भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलिसांनाच दमदाटी

भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलिसांनाच दमदाटी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: सोमवारी सायंकाळी ७ वाजता मंचर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी झाली होती. त्या वेळी पोलीस शिपाई फिरोज मोमीन हे सहकाऱ्यासह तिथे गेले. अक्षय विलास वाळुंज व अक्षय कैलास पिंगळे हे दोघे तरुण आपापसांत भांडण करत होते. मोमीन यांनी त्यांना भांडण करू नका, तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. त्यावेळी अक्षय वाळुंज याने मोमीन याची कॉलर धरून तुला बघून घेतो, माझा पाहुणा पोलीस अधिकारी आहे. तुझी नोकरी घालवतो असे बोलून शिवीगाळ, दमदाटी केली. अक्षय कैलास पिंगळे याने पोलीस नाईक ईश्वर कदम यांना शिवीगाळ, दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणला यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहे.

Web Title: The police who went to settle the dispute were forced