वाकड परिसरात पोलीस झाले सजग
By Admin | Updated: November 2, 2015 00:47 IST2015-11-02T00:47:05+5:302015-11-02T00:47:05+5:30
कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस कमी पडतात, हे वास्तव शहराच्या विविध भागात लोकमत टीमने रात्री फेरफटका मारल्यानंतर चव्हाट्यावर आले

वाकड परिसरात पोलीस झाले सजग
पिंपरी : कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस कमी पडतात, हे वास्तव शहराच्या विविध भागात लोकमत टीमने रात्री फेरफटका मारल्यानंतर चव्हाट्यावर आले. याबाबतचे वास्तववादी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल, टपऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम या भागात दिसून आला.
पोलीस व्हॅन, बीट मार्शलचे पोलीस ठिकठिकाणी गस्त घालताना दिसून येतात. परंतु गस्त घालताना ते उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानदारांना हटकत नाहीत. वाकड परिसरात पोलीस व्हॅन फिरत असूनही ज्या ठिकाणी रात्री अडीच वाजता चहा, पोहे, इडली, वडा असे नाष्ट्याचे पदार्थ, तसेच गुटखा, सिगारेट विक्री केली जातात. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी पिंपळे सौदागर भागात फिरून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडतात. साहित्य जमा केले जाईल, खटले दाखल होतील, अशी तंबी देतात. मात्र त्याच्या हद्दीतील वाकड भागातील चहा टपरी ते दारू विक्रीची हॉटेल रात्रभर सुरू असूनही कारवाईचे पाऊल उचलत नव्हते. (प्रतिनिधी)