शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसानेच केली गुटख्याची बेकायदा वाहतूक ; 30 हजारांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 20:36 IST

नारायणगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पाेलीसच गुटख्याची वाहतूक करत असल्याचे समाेर आले आहे.

नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य व्यक्तीला ( दि . १२ ) अटक करून त्यांचे कडून ३० हजाराचा गुटखा , तंबाखू आणि ३ लाख ५० हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार सह ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला , अधिक तपासात आळेफाटा येथील गुटखा व्यापा-याला काल रात्री उशिरा अटक केली,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली आहे. पोलीस पदाचा गैरवापर करून ड्रेसवरच गुटखा वाहतूक करणारा पोलीस आरोपी असल्याचे स्पष्ट  झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस धवडे हा शिरूर पोलिस ठाण्यात रात्र गस्तीवर नेमणुकीस होता,असे ही तपासात उघड झाले आहे .पोलीस कॉन्स्टेबल किशोर ज्ञानदेव धवडे , बक्कल  नं  ११३९  , शिरुर पोलीस ठाणे व  हनिफ इंब्राहमभाई तांबोळी (वय ५७) रा. शिरूर भाजीबाजार , ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर भा.दं.वि. २७२, २७३,१६८,१८८,२६९,२७० व कोविड  १९ उपाय योजना २०२० नियमानुसार , साथीचे रोग प्रतिबंधक का १८९७ क २,३,४ तसेच आप्पती व्यवस्थापन २००५ ,५१/२ आणि  अन्नसुरक्षा आधिनियम २००६ क २६ (२), २६ (४) ३० (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन किसन टाव्हरे यांनी दिली आहे. पोलिसांनी आळेफाटा येथील गुटखा विक्रेता इरफान मोमीन यास काल रात्री ११. ४९ वा . अटक केली, या सर्वाना जुन्नर न्यायालयात हजर केले असता या सर्व आरोपींना जामीन मंजूर केला .

याबाबत घोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,मांजरवाडी हद्दीत नाकाबंदी करून चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे, या चेकपोस्टवर पोलीस पाटील सचिन किसन टाव्हरे कृषी अधिकारी खेडकर , एसटी महामंडळाचे संतोष रोकडे , गजानन रोकडे , वनविभागाचे दशरय डोके व होमगार्ड अक्षय मुळे हे कार्यरत होते , दि. १० रोजी  रात्री १०.३० सुमारास जाधववाडी बाजुकडुन एक लाल रंगाची विना नंबर प्लेट असलेली स्विफ्ट कार येताना दिसली म्हणुन तिला थांबवीली असता या स्विफ्ट कार मध्ये मध्ये खाकी ड्रेस घातलेला एक पोलीस कर्मचारी व त्याच्या शेजारी एक मुस्लीम समाजाचा मौलाना बसलेला होता . त्यांना तुम्ही कोठे चालले आहेत असे विचारले असता त्यांनी आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे असे सांगितले व ते नारायणगावच्या दिशेने निघून गेले . मात्र ते जात असताना मौलाना यांच्याकडे पोलीस पाटलांनी पहिले असताना त्यांना संशय आला . त्यांनी हि बाब सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना सांगितली .

त्यानंतर पुन्हा  दि. ११ मध्यरात्री १२.३० सुमारास लाल स्वीफ्ट गाडी नारायणगाव बाजुने जोरात येताना दिसली . ती गाडी नारायणगावहुन मांजरवाडी मार्गे शिरूर कडे जात असताना मांजरवाडी येथे नाकाबंदी दरम्यान गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कॉन्स्टेबल किशोर धवडे याने गाडी न थांबविता जोराने जाधववाडी बाजुच्या रस्त्याचे दिशेने निघुन गेले . पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांनी तात्काळ पुढे काही ग्रामस्थांना मोबाईल वरून माहिती देऊन गाडीचा पाठलाग सुरु केला असता ग्रामस्थांनी भरघाव वेगाने येणाऱ्या कारला अडविण्यासाठी रस्त्यावर येऊन अखेर गाडीवर काठ्यांनी प्रहार करून स्विफ्ट कार थांबविली . त्याच दरम्यान नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस स्वप्नील लोहार , सातपुते , शेख यांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील बाजूमध्ये , हिरा पान , आर एम डि , सेंट तंबाखू ,गाय  छाप असे  ३० हजार  रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा व तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला . आळेफाटा येथील इरफान हमीद मोमीन ( वय – ४१ ) हा गुटखा विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . या प्रकरणी पुढील तपास अर्जुन घोडे पाटील हे करीत आहे .

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSmugglingतस्करी