शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:50 IST

कदमवाकवस्ती : पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ एक महिला दुचाकीवरून जात असताना, बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने संबंधित महिलेस आपल्या दुचाकीवर बसण्याची विनंती करीत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, की राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कदमवाकवस्ती येथील एमआयटी शिक्षण संस्थेला ...

कदमवाकवस्ती : पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ एक महिला दुचाकीवरून जात असताना, बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने संबंधित महिलेस आपल्या दुचाकीवर बसण्याची विनंती करीत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कदमवाकवस्ती येथील एमआयटी शिक्षण संस्थेला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी राज्यपालांच्या भेटीसाठी जिल्ह्यातून बंदोबस्त मागवण्यात आला होता. यापैकीच एक अठ्ठावन्नवर्षीय कनिष्ठ अधिकारी कवडीपाट टोलनाक्याजवळ बंदोबस्तासाठी उभे होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक महिला दुचाकीवरून जात असताना, संबंधित अधिकाºयाने आपल्या दुचाकीचा हॉर्न तीन वेळा वाजवला. मात्र संबंधित महिलेने लक्ष न दिल्याने, चौथ्या वेळी या महिलेस हातवारे करून आपल्या दुचाकीवर बसण्याची विनंती केली. यावर घाबरलेल्या महिलेने घडलेल्या घटनेची माहिती फोनवरून पतीला सांगितली. पतीने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन, संबंधित अधिकाºयाच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पोलीस अधिकारी असल्याने, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाºयाने महिलेच्या पतीला समजावून सांगून विनयभंगाऐवजी किरकोळ तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र, पती विनयभंगाच्या तक्रारीवर ठाम असल्याचे लक्षात येताच, संबंधित अधिकाºयाने रडण्याचे नाटक करण्यास सुरुवात केली. त्यातच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात गुंतले असल्याची संधी साधत, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाने विनयभंगाच्या तक्रारीचे रुपांतर किरकोळ तक्रारीत करून घेतले.याबाबत पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील म्हणाले, ‘‘राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह अनेक व्हीआयपी लोक एमआयटी शिक्षण संस्थेत असल्याने, दिवसभर बंदोबस्तात अडकलो असल्याने नेमके काय घडले याची माहिती नाही. पोलिसांनी एका कनिष्ठ अधिकाºयाच्याविरोधात किरकोळ तक्रार आल्याची माहिती दिली आहे. मात्र संबंधित अधिकाºयाने विनयभंग केला असेल, तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस