शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

भोंदूबाबाला रंगेहाथ पकडले, खेड शिवापूर येथे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 4:16 AM

भोंदूगिरी आणि जादूटोणा करून सामान्यांकडून पैसे उकळून फसवणूक करणाºया खेड-शिवापूर येथील भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.

नसरापूर : भोंदूगिरी आणि जादूटोणा करून सामान्यांकडून पैसे उकळून फसवणूक करणाºया खेड-शिवापूर येथील भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आज खेड-शिवापूर पोलीस चौकीत जादूटोणा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या सय्यद रुहुल अमिन ऊर्फ भंडारी बाबा या भोंदूबाबास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खेड-शिवापूर पोलीस स्टेशनला हडपसर तरवडेवस्ती येथील जितेंद्र दशरथ साळुंके यांनी तक्रार दिली आहे. तरवडे यांनी प्रापंचिक व व्यवसायात येणाºया अडचणींमुळे निराशेपोटी शिवापूर येथील दर्ग्यावर जात असत.त्यावेळी त्यांना शिवापूर येथील भंडारी बाबा यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी तरवडे त्याच्याकडे जाऊन त्यांना होत असलेल्या अडचणी त्यांनी सदर भोंदूबाबास सांगितल्या.त्याने त्यांच्या सर्व अडचणी दूर करतो, असे सांगत तुझ्यावर करणी केलेली आहे. त्याचा उपाय करण्याचे नाटक करून चार हजार रुपये घेतले. त्यानंतर या बाबाने त्यांची करणी काढली, असे सांगितले. तरी त्यांच्या अडचणी काही दूर झाल्या नव्हत्या. त्यावेळी तरवडे हे त्या भोंदूबाबाकडे पुन्हा जाऊन मला काही फरक पडला नाही. माझे पैसे मला परत करा, असे सांगितल्यावर या बाबाने त्यांना शिवीगाळ केली.येथे पुन्हा परत यायचे नाही, असे सांगत हाकलुन दिले. त्यांनी नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्याच्या पुढाकारातून तक्रार केली आहे.- याप्रकरणी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख आदी कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा करून या भोंदूबाबाची खेड-शिवापूर पोलीस चौकीत तक्रार केली आहे. या प्रकरणी खेड-शिवापूर पोलिसांनी या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे तपास करीत आहेत.