पोलीस चोरट्यामागे... आम्हाला काय ?

By Admin | Updated: February 10, 2017 03:24 IST2017-02-10T03:24:56+5:302017-02-10T03:24:56+5:30

एक एसटी बस फलटणकडे निघालेली असते... सिग्नलला उभी राहते... पदपथावरून एक जण येतो... प्रवाशाचा मोबाईल खिडकीतून हात घालून पळवतो.

Police Thieves ... What about us? | पोलीस चोरट्यामागे... आम्हाला काय ?

पोलीस चोरट्यामागे... आम्हाला काय ?

पुणे : एक एसटी बस फलटणकडे निघालेली असते... सिग्नलला उभी राहते... पदपथावरून एक जण येतो... प्रवाशाचा मोबाईल खिडकीतून हात घालून पळवतो... बसच्या पाठीमागे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव सिग्नलला उभे असतात... चोरट्याला पळताना पाहून ते पाठलाग सुरू करतात... चोरटा विरुद्ध दिशेला जातो... जाधव दुचाकी तेथेच टाकून त्याचा पाठलाग करतात... काही अंतरावर चोरटा एका सोसायटीमध्ये शिरतो... पाठोपाठ जाधव आतमध्ये घुसतात... त्याला जेरबंद करून बाहेर खेचत आणतात... मात्र, या सर्व धावपळीत एकही नागरिक त्यांच्या मदतीला येत नाही.
हे चित्रपटातील दृष्य नाही तर बुधवारी रामटेकडी जंक्शनवर घडलेली सत्य घटना आहे. विशेष म्हणजे हद्द नसतानाही जाधव यांनी हे धाडस दाखवले. या प्रकरणी प्रतीक मदन शिंदे (वय २५, रा. ११०, रामटेकडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राम चांडक (वय ३३, रा. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडक हे बुधवारी संध्याकाळी स्वारगेट एसटी आगारामध्ये पुणे-मंगळवेढा एसटीमध्ये बसले होते. बस सोलापूर रस्त्याने जात असताना रामटेकडी जंक्शन सिग्नलवर थांबली.

Web Title: Police Thieves ... What about us?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.