शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

विनयभंगाची घटना घडल्यास तातडीने द्या तक्रार ; क्षणार्धात पाेहचतील पाेलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:33 IST

विनयभंगाची तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीच्या तक्रारीकडे पाेलीस कशापद्धतीने हाताळतात याचे लाेकमतने केलेले स्टिंग ऑपरेशन

सुषमा नेहरकर-शिंदे / प्रज्ञा केळकर सिंग

पुणे : विनयभंग ओळखीच्यांकडून झाला, तरच त्याची तक्रार घ्यायची. अनोळखी व्यक्तीकडून विनयभंग होत असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेची तक्रार घेण्यास पोलीस अनुत्सुक असल्याचा अनुभव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला आहे. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशातील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात शिक्षण, नोकरी व कामासाठी घराबाहेर पडलेल्या  मुली, महिलांना अनेक लहानमोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी स्टिंग ऑपरेशन केले. बसस्टॉपवर मुली, महिला यांना अनोळखी पुरुषांकाडून होणारा त्रास व त्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर येणारा अनुभव काय असतो, याचा शोध घेण्यात आला.  

मध्यवस्तीतील एका पोलीस चौकीत गेल्यानंतर तेथे उपस्थित महिला पोलिसाने ‘काय काम आहे?’ विचारले. त्यांना काय  प्रसंग घडला ते  सविस्तर सांगितले. या महिला पोलिसानेदेखील नाव, गाव, पत्ता माहीत नसलेल्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार करून काहीच उपयोग नाही. तक्रार दिली तर त्याचा शोध लागेपर्यंत तुलाच सारखं पोलीस चौकीत यावं लागेल, असे सांगितले. त्यापेक्षा पुढच्या वेळी तो माणूस दिसला, की त्वरित १०० नंबरवर फोन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चौकातील उपस्थित वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांनीदेखील निनावी व्यक्तींच्या विरोधामध्ये तक्रार देऊन उपयोग नाही, असे सांगत त्याला खरेच अद्दल घडविण्यासाठी पुन्हा दिसल्यावर थेट १०० नंबर आणि १०९३ नंबरच फोन करण्याचा सल्ला दिला.  पोलीस मदतीसाठी तयार असतात. परंतु, विनयभंगाची तक्रार दाखल करून घेऊन तपासाचे घोंगडे मागे लावून घेण्याची मानसिकता नसल्याचेच दिसून आले आहे. मात्र, एखाद्या अनोळखीकडून भविष्यात काही विपरित प्रसंग घडण्याची वाट पाहायची का? हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित  झाला आहे. पहिला प्रसंगतरुणी  :  नमस्कर मॅडम, मी सिंहगड रोडला राहते. मी एका प्रोजेक्टच्या कामासाठी आठवड्यातून तीन-चार वेळा शनिवार पेठेत येते. पण गेल्या काही महिन्यांपासून बसस्टॉपवर एक माणूस सतत विचित्र नजरेने पाहत असतो. आजही असाच पाहत असताना मी त्याला हटकले. तर मलाच म्हणाला, ‘तुला पाहून घेईन.’ मी थोडी घाबरलेच आणि ‘पोलिसांकडे तक्रार करेन’ म्हटले तर ‘तुला काय करायच ते कर. तुला पाहून घेतो,’ असे म्हणून निघून गेला. म्हणून मी तक्रार करायला आले आहे. माझ्याकडेच नाही तर बस्टस्टॉपवरील इतर मुली व महिलांनादेखील त्या माणसाचा त्रास होतो.

पोलीस कर्मचारी : तक्रार  कुणाविषयी घेणार त्याचे नाव माहिती आहे का? पत्ता? काहीच माहीत नाही; मग तक्रार देऊन काय उपयोग? त्यापेक्षा पुढच्या वेळी तो दिसला, की त्याला कळणार नाही, असे पाहून १०० नंबर अथवा १०९३वर फोन कर. मार्शलचे पोलिस त्वरित येऊन त्याला पकडतील. रस्त्यावरच पोलिसांनी पकडल्यावर व मार खात पोलीस चौकीत आणल्यावर त्याला चांगली अद्दल घडेल.....

तरुणी : सर मी कालपरवा पेपरमध्ये वाचले होते, की अशा लोकांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देता येते. 

पोलीस कर्मचारी : तू काय शिकते?

तरुणी : सर मी एमए करते.

पोलीस कर्मचारी :  एवढे चांगल शिक्षण घेते. एमपीएसचीचापण अभ्यास करत असशील, तर कायदेदेखील माहित असतील थोडे. विनयभंगाची तक्रार देण्यासाठी त्या माणसाचे नाव माहिती नाही, किमान पत्ता माहीत असता तर थेट उचलून आणले असते.

तरुणी : पण सर मला कसे माहित असेल त्याचा नाव-पत्ता.... आमची ओळख नाही... आणि मलाच नाही तर बसस्टॉपवरील इतर मुली आणि महिलांनादेखील तो असाच त्रास देतो.

पोलीस कर्मचारी :  हो म्हणूनच सांगतो, की तू पुढच्या वेळी १०० नंबरवर फोन कर आणि आपण त्याला जागेवरच पकडून चांगला चोप देऊ.

दुसरा प्रसंग महिला : साहेब तक्रार नोंदवायची होती. मी दररोज सकाळी बसने ऑफिसला येते. ऑफिस-जवळच्या बसस्टॉपवर उतरले, की एक माणूस बसस्टॉपवर बसलेला असतो. वाईट नजरेने पाहतो आणि इशारेही करतो. मी काही दिवस दुर्लक्ष केलं; पण सतत १०-१२ दिवस असं घडतंय.

पोलीस अधिकारी : त्या माणसाला तुम्ही ओळखता का? बसस्टॉपजवळ त्याचं दुकान वगैरे आहे का? वय किती असेल साधारण?

महिला : नाही सर, मी ओळखत नाही त्याला. दुकान वगैरे असेल आजूबाजूला असंही वाटत नाही. कारण, तो बसस्टॉपवरच निवांत बसलेला असतो. साधारण ४८-५० वर्षे वय असेल.

पोलीस : संध्याकाळी असतो का तो तिथं? कधी पाहिलंय का? 

महिला : संध्याकाळी माझा घरी जाण्याचा मार्ग वेगळा आहे. (कामाचे ठिकाण, बसमधून उतरण्याची वेळ वगैरे माहिती घेऊन झाल्यावर)

अधिकारी : तुम्ही माझा नंबर लिहून घ्या. तुमचाही नंबर द्या. उद्याच आमच्या मार्शलला तिथे पाठवतो. दोन फटके मारले, की सरळ होईल. गरज वाटलीच तर तक्रारही दाखल करून टाकू. काळजी करू नका. आपण त्याचा बंदोबस्त करू.

विनयभंगाच्या अज्ञाताविरोधात तक्रारी घ्यायला हव्यात अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी अज्ञात असतात, पोलिसांनी त्यासंबंधित सर्व माहिती गोळा करून तो गुन्हा उघड करायचा असतो़ विनयभंगाच्या प्रकरणात यापूर्वीही अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत़ संबंधित संशयिताचे रेखाचित्र तयार करून ज्या ठिकाणी गुन्हा घडला़, त्या ठिकाणी असलेले प्रत्यक्षदर्शी अथवा अन्य साधनांचा वापर करून पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत़ पोलिसांकडे आलेल्या तक्रारींचा तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न असतो़ काही जण जर तक्रार दाखल करून घेत नसतील तर अशा वेळी त्या-त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधावा़ महिलांच्या प्रत्येक तक्रारीची पोलीस गंभीरपणे दखल घेतात़  - अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे

पोलिसांनी दुर्लक्षपणा कमी करण्याची गरजसमाजामध्ये आजही पोलिसांचा धाक आहे. पोलीस म्हटले, की नागरिक घाबरतात. यामुळे नागरिक, महिला अनेक लहानमोठ्या गोष्टींच्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे जातात; परंतु बहुतेक वेळा पोलीस अशा तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. यामध्येदेखील एखादी महिला, मुलगी खालच्या वर्गातील असेल तर तिलाच चार शब्द ऐकवून पाठवून देता. परंतु, पोलिसांनी हा आपला दुर्लक्ष करण्याचा संभाव थोडा बाजूला ठेवला, एखादी महिला, मुलगी काय सांगते त्यांच्या मागचा हेतू लक्षात घेऊन कृती केल्यास भविष्यात घडणाºया गंभीर घटनांना आळा बसू शकतो. परंतु तक्रार दाखल करून घेतली, की आपले काम वाढेल यासाठी अनेक वेळा दुर्लक्ष करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.- सुप्रिया कोठारी, वकील

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला