रेमडेसिविर काळ्याबाजाराचा पोलीस उपनिरीक्षकाने असा घेतला गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST2021-04-25T04:11:12+5:302021-04-25T04:11:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाकडून त्याचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका ...

The police sub-inspector of Remedesivir black market took such an advantage | रेमडेसिविर काळ्याबाजाराचा पोलीस उपनिरीक्षकाने असा घेतला गैरफायदा

रेमडेसिविर काळ्याबाजाराचा पोलीस उपनिरीक्षकाने असा घेतला गैरफायदा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाकडून त्याचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने रेमडेसिविरची जादा दराने विक्री केल्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून पार्टी घेतली. धक्कादायक म्हणजे या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनही केले.

दीपक माने असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. दीपक माने हा गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये सध्या कार्यरत होता. पोलीस आयुक्तांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासादरम्यान, माने याची आरोपीच्या नातेवाइकांशी ओळख झाली. माने हा २० एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाइकांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याने मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत त्याने या नातेवाइकांच्या लहान मुलीबरोबर अश्लील वर्तन करून तिची छेडछाड केली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली.

याबाबत एका महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने दीपक माने याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. माने यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: The police sub-inspector of Remedesivir black market took such an advantage