गणेशोत्सव काळात पोलीस पाटलांनी सतर्क राहावे : महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:16 IST2021-09-10T04:16:39+5:302021-09-10T04:16:39+5:30

जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व पोलीस पाटील यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये गणेश उत्सव ...

Police should be vigilant during Ganeshotsav: Mahadik | गणेशोत्सव काळात पोलीस पाटलांनी सतर्क राहावे : महाडिक

गणेशोत्सव काळात पोलीस पाटलांनी सतर्क राहावे : महाडिक

जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व पोलीस पाटील यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये गणेश उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी महाडिक बोलत होते.

सुनील महाडिक म्हणाले की, सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे. गावातील अनेक सोशल मीडिया ग्रुपमधून चुकीचे संदेश पाठवले जातात. यातून अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पोलीस पाटलांनी यावर लक्ष द्यायला हवे. अशा लोकांची माहिती संकलित करून पोलीस स्टेशनला दिल्यास पुढे घडणारे मोठे गुन्हे टाळता येतील. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.

090921\img-20210909-wa0084.jpg

????? ???????? ?????????? ?????? ????? ???????? ????? ??????

Web Title: Police should be vigilant during Ganeshotsav: Mahadik