शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास निवृत्त न्यायाधिशांना अटक करू : पोलीस उपायुक्त शिवाजी पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 22:15 IST

माओवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून आत्तापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही नावे आहे. त्यांची नावे आत्ताच जाहीर करणार नसून ती न्यायालयाला देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकाही नावे नंतर जाहीर करणारसीपीआय (माओवादी) या संघटनेची फ्रंटल आॅर्गनायझेशन म्हणून आयएपीएल संस्थेतील सदस्यांचा सहभाग

पुणे : तपासाच्या अनुषंगााने गरज पडल्यास इंडियन असोसिएशन आॅफ पीपल्स लॉयर्सचे (आयएपीएल) अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एच. सुरेद्र यांना देखील अटक करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी शुक्रवारी न्यायालयास सांगितले.माओवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून आत्तापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही नावे आहे. त्यांची नावे आत्ताच जाहीर करणार नसून ती न्यायालयाला देण्यात आली आहेत.बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेची फ्रंटल आॅर्गनायझेशन म्हणून आयएपीएल संस्थेतील संदस्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एच. सुरेश आहेत. त्यांचाही नक्षली कारावायांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास गरज पडल्यास त्यांनाही अटक करणार असल्याचे गुन्ह्याचे तपास अधिकारी डॉ. पवार यांनी न्यायालयात जामीनाला विरोध करताना सांगितले. आयएपीएल या संघटनेतील वकील भूमिगत असलेल्या माओवादी कार्यकर्त्यांसाठी मध्यस्थीचे काम करीत आहेत. एका घटनेत १२ माओवादी मारले गेले होते. त्यामुळे संघटनेतील सदस्यांचे मनोबल खचले होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती करावी. त्या समितीद्वारे निष्कर्ष काढण्यात यावा की, मारले गेलेले गोरगरिब अदिवासी होते, असे अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांना कॉम्रेड प्रकाश यांनी लिहिलेल्या एका पत्रात नमूद आहे. आयएपीएलच्यावतीने अयोजीत युएपीए या कायद्यावरील व्याख्यानाला भूमिगत नेते आणि काश्मिरमधील अलगाववादी नेताही या परिषदेला उपस्थित होता. तसेच व्याख्यानमालेसाठी १० लाख ५० हजार रुपये देखील मागण्यात आले होते, असे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सांगितले. अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी १० आॅक्टोबरला पुस्तकांसाठी अर्ज करून, न्यायालयाने त्यावर आदेश देऊन अद्यापही गडलिंग यांना कायद्याची पुस्तके कोठडीत देण्यात आली नाहीत. याबाबत न्यायाधीशांनीही तुरुंग प्रशासनाला जाब विचारला व याबाबत स्वतंत्र चौकशी केली जाईल असे सांगितले. पुस्तके दिल्यानंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाला सादर करावे, असेही न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक