पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून हस्तगत केल्या दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:25+5:302021-03-17T04:13:25+5:30
खोडद( ता. जुन्नर,मूळ रा. कोपरगाव , जिल्हा - अहमदनगर ) येथील १५ वर्षीय मुलावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून हस्तगत केल्या दुचाकी
खोडद( ता. जुन्नर,मूळ रा. कोपरगाव , जिल्हा - अहमदनगर ) येथील १५ वर्षीय मुलावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार , निमगाव सावा येथे १५ वर्षीय मुलगा संशयित रित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्याला नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आणून सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दयानंद (नावात बदल) असे सांगितले . या माहितीवरून पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज ताटे ,पोलीस नाईक संतोष दुपारगुडे ,धनंजय पालवे ,भिमा लोंढे ,दिनेश साबळे,सचिन कोबल,सत्यम केळकर,अनिल तांबे,होमगार्ड अक्षय मुळे यांनी सखोल चौकशी केली असता निमगाव सावा, १४ नंबर परिसरातून एकूण ५ दुचाकी आणि ३ मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले.
नारायणगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून हस्तगत केलेल्या दुचाकी आणि चोरीचे मोबाईल. यावेळी पोलीस अधिकारी पृथ्वीराज ताटे व पोलीस पथक