शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO | पोलिसांचे कौतुकास्पद काम! जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:12 IST

पुणे शहरातील घटना...

शिवणे (पुणे): शुक्रवारी संध्याकाळी गस्तीवर असताना पोलीस शिपाई सद्दाम शेख आणि अजित पोकरे यांना एक तरुण ओढ्याच्या पाण्यात आत्महत्येचा प्रयत्न असल्याची खबर मिळाली. दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता बागुल उद्यान जवळ असलेल्या ओढ्याजवळ पोहोचले. सद्दाम शेख यांनी ओढ्यात असलेल्या तरुणाला पाण्यात उतरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तरुणाने त्यांना न जुमानता त्यांना धक्का देऊन पाण्यात उडी मारली पाठोपाठ सद्दाम यांनीदेखील ओढ्यामध्ये उडी मारली.

ओढा जवळपास १० फूट खोल असल्याचे सांगण्यात आले. शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला ओढ्याच्या कडेला ओढत आणले आणि त्याचे प्राण वाचवले. हे घडत असताना परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती, सद्दाम शेख यांच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले आणि सुटकेचा निश्वास टाकला.

एखादी नाट्यमय घटना घडावी त्याप्रमाणे बागुल उद्यान जवळील ओढा परिसरात घडली. दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे हे संध्याकाळी गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्षातून एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची खबर मिळाली, खबर मिळताच दोघेही घटनास्थळी पोहोचले.

गेल्या काही दिवसात होणाऱ्या सततच्या पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. शेख आणि पोकरे जेव्हा पोहोचले तेव्हा एक तरुण ओढ्यामध्ये उभा असल्याचे दिसला त्याला पाण्याच्या बाहेर येण्यास सांगितले परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष करून अजून मधोमध जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर पोकरे यांनी दोरी धरून शेख ओढ्यात उतरले आणि त्यांनी तरुणाला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला परंतू त्या तरुणाने शेख ह्यांच्या हाताला हिसका देत पाण्यात उडी मारली आणि पाण्याच्या वेगामुळे तो वाहू लागला.

त्यावेळी सद्दाम शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या वेगवान पाण्यात उडी मारून त्या तरुणाला वाचवले आणि ओढ्याच्या बाहेर आणले. ही घटना घडत असताना परिसरातील शेकडो नागरिक ही घटना मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करत होते. सद्दाम शेख यांनी दाखवलेल्या धाडस आणि साहसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdrowningपाण्यात बुडणे