म्हाळुंगेत पोलिसांचा रूट मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST2021-01-16T04:13:55+5:302021-01-16T04:13:55+5:30

महाळुंगे येथे पोलीस चौकीचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांची दंगा काबू योजनेबाबत रंगीत तालीम घेण्यात आली. निवडणूक ...

Police route march in Mahalunga | म्हाळुंगेत पोलिसांचा रूट मार्च

म्हाळुंगेत पोलिसांचा रूट मार्च

महाळुंगे येथे पोलीस चौकीचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांची दंगा काबू योजनेबाबत रंगीत तालीम घेण्यात आली.

निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व निवडणूक शांततेत पार पाडाव्यात याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सूचना दिल्या. महाळुंगे येथील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी होमगार्ड असे सोबत लाठी हेल्मेट ढाल व रायफल घेऊन पोलीस चौकीच्या हद्दीतील महाळुंगे या संवेदनशील गावात रूट मार्च काढण्यात आला. तसेच आगामी येणाऱ्या निवडणूक संदर्भात गावाचा आढावा घेण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च काढण्यात आला.

फोटो

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाळुंगे पोलिसांचा रूट मार्च

Web Title: Police route march in Mahalunga