शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर, दंडात्मक कारवाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 17:22 IST

जिल्हाबंदीच्या आदेशानंतर पुणे - सातारा सीमेवर पोलिसांचा फौजफाटा तैनात

ठळक मुद्देरस्त्यावरून अनेक वाहने विनाकारण प्रवास करत असल्याचे चित्र

सांगवी: राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काल रात्री झालेल्या जिल्हाबंदीच्या आदेशानंतर पुणे - सातारा सीमेवर बारामती तालुका पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०-४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात विनवणी करून विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाबंदीच्या आदेशानंतर देखील बारामती- फलटण रस्त्यावरून अनेक वाहने विनाकारण ये-जा करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.राज्यासह जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्यातच इतर जिल्ह्यातून बाधित रुग्ण पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे बारामतीतील रुग्णालय पूर्णपणे भरली असून जिल्ह्यातील रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने बारामती तालुक्यातील सांगवी येथे सातारा सीमेवर आता पोलिसांचा फौज फाटा तैनात करून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सातारा, सांगली, फलटण वरून येणाऱ्या दुचाकीसह मोठ्या वाहनांची कसून चौकशी करून नियम तोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्यात होतं असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उद्रेकाचा परिमाण लक्षात आल्याने राज्यशासनाने राज्यातील जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी सुरू केली आहे. सध्या पोलिसांकडून बारामतीत परजिल्ह्यातून अथवा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे.

त्यानुसार बारामती - फलटण रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार सुरेश साळवे,पोलीस नाईक रावसाहेब गायकवाड,निखिल जाधव,योगेश चितारे,दीपक दराडे,होमगार्ड आसिफ शेख हे कारवाई करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याBaramatiबारामतीGovernmentसरकारPoliceपोलिस