शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीतील गैरप्रकाराची माहिती देणाऱ्यास बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:50 IST

पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़.  त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होणार आहे़ . 

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांची घोषणा : शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी सुरु     पोलीस भरतीमध्ये काही गैरप्रकार आढळल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार

पुणे : राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा मुख्यालयात सोमवारपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या पोलीस भरतीत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अशी माहिती कळविणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा केली आहे़ . पुणे ग्रामीण पोलीस दलातील १२१ आणि ४९ कारागृह विभागातील पोलीस शिपाईपदासाठी ही भरती करण्यात येत आहे़. त्यासाठी सुमारे ३० हजार अर्ज ग्रामीण पोलीस दलाकडे आले असून त्यांच्या शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीस सोमवारपासून सुरुवात झाली आहे़. ही पोलीस भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे़. यापूर्वी काही उमेदवारांनी डमी उमेदवारांना परीक्षेला बसविण्याचे प्रकार उघडकीस आले होते़ .अशाप्रकारे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी यंदा सुरुवातीपासूनच काळजी घेण्यात येत आहे़. या पोलीस भरतीमध्ये काही गैरप्रकार आढळल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे़ .गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल़ गैरप्रकार आढळल्यास संबंधितांनी पोलीस अधीक्षक (९८२३६२३२१०), पोलीस उपअधीक्षक गृह मुख्यालय (९६८९७७०७७७), हेल्पलाईन (८५५२०१७२८४, ८५५२०२७२८४) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़. पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़.  त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होणार आहे़ . 

पोलीस भरतीसाठीची प्रक्रिया आम्ही अतिशय पारदर्शक ठेवण्यात आली असून त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याची काळजी घेतली आहे़. तरीही कोणाला असा काही गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यांनी आम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व माहिती योग्य आढळल्यास त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे़ .सुवेझ हक, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस

टॅग्स :Puneपुणेpolice parade groundपोलिस कवायत मैदानSuvez Haqसुवेज हक