अवैध मटका, जुगार धंद्यावर पोलिसांचा छापा; ६० जणांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST2021-06-20T04:08:18+5:302021-06-20T04:08:18+5:30
जुगार अड्डा चालविणारे अनिल जयसिंग कांचन (वय ४२ रा. आश्रमगड उरळी कांचन), संजय निवृत्ती बडेकर (वय ५३ रा. बडेकरनगर, ...

अवैध मटका, जुगार धंद्यावर पोलिसांचा छापा; ६० जणांविरुद्ध कारवाई
जुगार अड्डा चालविणारे अनिल जयसिंग कांचन (वय ४२ रा. आश्रमगड उरळी कांचन), संजय निवृत्ती बडेकर (वय ५३ रा. बडेकरनगर, उरळी कांचन), अतुल ऊर्फ अप्पा बापूसाहेब कांचन (वय ४३, रा. पांढरस्थळ डाळिंब रस्ता, उरळी कांचन), योगेश ऊर्फ बाळा सोपान कांचन (वय ४०, रा. उरळी कांचन ) यांच्यासह १३ पानी रमी जुगार खेळणारे ३४ जण, जुगार खेळण्यासाठी थांबलेले ७ जण आणि जुगार अड्ड्यावर काम करणारे १५ जण अशा एकूण ६० जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या शिल्पा चव्हाण तसेच दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर आणि सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांनी ही कामगिरी केली.
-----------------------