शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ‘हॉटेल प्यासा’वर पोलिसांचा छापा; शहरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 12:00 IST

बेकायदा दारु विक्री व हुक्का पार्लर चालविल्यावरुन कारवाई

पुणे : शहरातील मंडई परिसरातील हॉटेल प्यासावर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा घालून अवैध मद्य विक्री आणि हुक्का पार्लर चालविण्याबद्दल कारवाई केली. हॉटेल प्यासा वरील कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन खडक पोलिसांनी प्यासा हॉटेलचे मॅनेजर मनोज शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील काही मोजक्या हॉटेल तसेच अन्य व्यावसायिकांवर शहर पोलीस दलाची कायम कृपादृष्टी असल्याचे बोलले जाते. त्यात मंडईमधील हॉटेल प्यारा चा समावेश केला जात होता. शहरात काहीही घडले तरी या हॉटेलवर कधी कारवाई होणार नाही, अशी हॉटेल प्यासाची ख्याती आहे. आजवर या हॉटेलवर कधी कारवाई झाली नसल्याचे सांगितले जाते. हे हॉटेल उशिरापर्यंत सुरु असले तरी त्यावर कधी कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात होते. 

पोलिसांनी गुंड, संघटित टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु केली आहेत. त्यातूनच हा छापा टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलीस उपायुक्त प्रिंयका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता हॉटेल प्यासावर छापा टाकला. त्यात हॉटेलचा मॅनेजर मनोज शेट्टी याने अवैधपणे हुक्का पार्लर चालवून व बार व्यतिरिक्त रोडलगत मद्य विक्रीकरीता वेगळे काऊंटर बनवून तेथे विनापरवाना अनधिकृतपणे मद्यविक्री करीत असताना मिळून आला. पोलिसांनी या हॉटेलमधून १ लाख १० हजार ६३० रुपयांचे विदेशी मद्य, रोख ६ हजार ७२० रुपये व १९१० रुपयांची हुक्क्याची साधने असा १ लाख १९ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलraidधाडPoliceपोलिस